गावठी पिस्टल बाळगणारे २ आरोपीना जालना पोलीसानी केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना


एक विधीसंघर्षग्रस्त बालकही घेतला ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.

त्यावरुन श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे एक पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते.

दिनांक 19/04/2025 रोजी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना इसम नामे यश बाबासाहेब भोडे रा. काजळा, ता.जि. जालना हा गावठी पिस्टल बाळगुन असल्याची माहिती मिळाल्याने त्यास इंदेवाडी परिसरातून ताब्यात घेवुन त्याकडुन रु.40,000/- किंमतीचे एक गावठी पिस्टल व आरोपीचा रु.40,000/- किंमतीचा आयफोन मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आला असुन सदरचे पिस्टल हे त्याने त्याचा मित्र नामे शिवम कैलास जाधव वय 22 वर्षे राहणार नरेश कॉम्पलेक्स अंबड रोड जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक या तिघांनी रु.40,000/- जमवुन घेतले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, रमेश काळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट