गावठी पिस्टल खरेदि विक्री करणाऱ्या इसमांना १ पिस्टल व ५ जिवंत काडतुसांसह स्था. गुन्हे शाखा जालना यानी केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

दिनांक 02/07/2025 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बंसल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी सो यांनी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टल बाळगणा-या इसमांचा शोध घेऊन विशेष मोहीम राबवून कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन त्या बाबत सुचना देऊन मार्गदर्शन केले व पोलीस स्टेशन अंबड व घनसावंगी येथे दाखल असलेल्या पिस्टलच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद रा. पानेवाडी ता. घनसावंगी जि. जालना याचा शोध घेणे बाबत आदेशीत केल्याने त्याचा शोध घेत असतांना गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद रा. पानेवाडी ता.धनसावंगी जि. जालना हा गांधीनगर येथे त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असतांना समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद वय 21 वर्षे, रा.पानेवाडी ता. घनसावंगी जि. जालना हा मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात व कब्जात त्याचे कमरेला खोवलेली एक गावठी पिस्टल व 05 जिवंत काडतुस मिळुन आले त्यास सदरचे पिस्टल व जिवंत काडतुस कोठुन आणले या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचा मित्र कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे रा. गांधीनगर जालना याचेकडुन खरेदि केली असल्याचे सांगीतल्याने आरोपी नामे कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे वय 31 वर्षे रा. गांधीनगर जालना यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने काही दिवसापूर्वी सदचे पिस्टल व जिवंत काडतुस हे समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद यास विक्री केले असल्याचे सांगीतले. सदर आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे कलम 3/25 आर्म अॅक्ट व मपोका कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी साहेब उप विभाग जालना श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, देविदास भोजने, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, कैलास खार्डे, इर्शाद पटेल, संदिप चिचोले, संभाजी तनपुरे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, अक्रूर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षिरसागर चालक अशोक जाधवर, सौरभ मुळे सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट