गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपी अर्जुन कोळीस स्था. गुन्हे शाखा जळगावने केली अटक..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जळगांव

स्थानिक गुन्हे शाखा पथकास दिनांक ०३/०४/२०२५ रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील अर्जुन कोळी हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल जवळ बाळगत आहे. त्यावर त्याची माहीती घेता तो घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतिक टि सेंन्टर जवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतिक टि सेंटर जवळ जावून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता एक संशयीत इसम यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अर्जुन जनार्दन कोळी, वय ३०, रा. घोडसगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगाव असे सांगीतले. त्याची अंगझडती घेता त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटीचा पिस्तोल अंदाजे २०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल विनापास परमिट शिवाय बेकायदेशीर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला CCTNS NO ९९/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.

सदरची कारवाई ही मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट