गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसह फरार आरोपीस वैजापुर पोलीसांनी ठोकल्या बेडया…

प्रतिनिधी- रणजित मस्के
वैजापुर: वैजापुर तालुक्यातील कापुसवडगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे बाबत यातील संशयीत आरोपी नामे उमेश रमेश निगळ रा. कापुस वडगाव ता. वैजापुर याचे विरुध्द पोलीस ठाणे वैजापुर येथे भादवी कलम ३६३, ३७६ (२), व पोस्को अॅक्ट कलम ४, ६ सह बालविवाह अधिनियम १०,११ अन्वये गुन्हा दाखल असुन या गुन्हयात सदर आरोपी हा मागील चार महिण्यापासुन फरार होता. मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली वैजापुर पोलीसांचे पथक याचा कसोशिने शोध घेत होते.
दिनांक २४/९/२०२२ रोजी वैजापुर पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फेत माहिती मिळाली कि उमेश रमेश निगळ रा. कापुस वडगाव हा लाडगाव चौफुली येथे आला असुन त्याचे कडे गावठी कटा व जिवंत काडतुस (राऊंड) असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने वैजापुर पोलीसांचे पथकाने तात्काळ पंचासह लाडगाव चौफुली येथे सापळा लावून फरार आरोपी उमेश रमेश निगळ याचेवर अचानक झडप घालुन त्यास पकडले त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा व त्यात ०३ जिवंत काडतुस ( राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगलेला मिळुन आला आहे.

त्याचे जवळ मिळालेला सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा व मॅगझीन मधील जिवंत ७.६५ mm तीन जिवंत काडतुस ( राऊंड) जप्त करण्यात आले असुन त्याचे विरुध्द पोलीस ठाणे वैजापुर येथे कलम ३,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास वैजापुर पोलीस करित आहेत.
नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड अपर पोलीस अधीक्षक, शिलवंत नांदेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापुर ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत, पो.उप.नि. श्रीराम काळे, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, अमोल मोरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co