गावठी कट्टसह आरोपी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाच्या ताब्यात…

प्रतिनिधी-रणजित मस्के
सातारा : एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं.873/2022 आर्म अॅक्ट कलम-3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 [1][3]चे उल्लंघन प्रमाणे दिनांक 17.12.2022 रोजी 21.47 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हांत मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो यांनी आर्म अॅक्ट गुन्हांची माहीती काढून कार्यवाही करणे बाबत आदेश केले होते. दिनांक 17.12.2022 रोजी सायंकाळी 18.00 वाजता एम आय डी सी पोस्टे गुन्हे शोध पथकाती पोना विकास सातदिवे यांना माहीती मिळाली की, दोन इसम हे अजिंठा चौफुली येथे गावठी कट्टासह फिरत आहे त्यावरुन सदरची माहीती मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांना कळविले वरुन शोध पथकातील कर्मचारीचे पथक तयार करुन जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे गेले असता आरोपी 1] अक्षय प्रकाश घारु वय-21, 2) नितीन देविदयाल सालवें वय-25 दोघे रा. फुकटपुरा, ब-हाणपुर मध्यप्रदेश असे असुन त्यापैकी आरोपी क्र. 01 यांच्या कब्जात 20,000/- रु किची विनापास परवाना शिवाय अनाधिकृत एक गावठी कट्टा मिळुप आला आहे तसेच मा. जिल्हाधिकारी सो. यांनी पारीत केलेल्या आदेशाचे उल्लंधन करून मिळुन आले आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकात गवळी सो, व मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो. जळगाव भाग जळगाव व मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो एम आय डी सी पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सफी आनंदसिंग पाटील, पोहेकॉ सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश शिरसाळे, पोकॉ किरण पाटील अशांनी केली असुन सदर गुन्हांचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com