छावा प्रतिष्ठान आयोजित रायगड जिल्ह्यातील माणगांव महोत्सवामध्ये गौतमी पाटील सुपरहिट!

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

रायगड :-छावा प्रतिष्ठान आयोजित माणगांव महोत्सव म्हणजे माणगांव तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांना खेळ व मनोरंजनाची पर्वणीच असते ज्यामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा,मिस माणगांव सौंदर्यवती स्पर्धा,तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना माणगांव रत्न पुरस्कार,बच्चेकंपनी साठी आकाशपाळणे,विविध खेळ,रोमहर्षक जादूचे प्रयोग, तरुणाईसाठी भव्य नृत्य स्पर्धा अश्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात,परंतु ह्यावर्षी मुख्य आकर्षण ठरले ते महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध लावणी कलाकार नृत्यांगना गौतमी पाटील यांचे.गौतमी पाटील या आपल्या भडक नृत्यामुळे यापूर्वी वादात अडकल्या होत्या त्यामुळे माणगांवमध्ये त्यांचा कार्यक्रम नक्की कशा प्रकारे होतो याबद्दल नागरिकांकडून विविध मत-मतांतरे सोशल मीडियावर मांडली जात होती.परंतु जेव्हा गौतमी पाटील आयोजक निलेश थोरे यांच्यासमवेत माणगांव महोत्सव मैदानात दाखल झाल्या तेव्हा माणगांव तालुक्यातील हजारो नागरिकांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले व सगळ्यात महत्वाचे म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित १० ते १२ हजार नागरिकांमध्ये महिलांची उपस्थिती ही पुरुषांपेक्षा जास्त होती.गौतमी पाटील यांचे पंचायत समिती सदस्या सौ. रचना निलेश थोरे,नगरसेविका कु.ममता थोरे व छावा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.आपल्या मनोगतात बोलताना युवानेते निलेश थोरे यांनी सांगितले कि गौतमी पाटील यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष करून,टीका सहन करून आज महाराष्ट्रात आपली ओळख तयार केली आहे.

एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळातील चुकांसाठी त्या व्यक्ती/कलाकाराचे वर्तमान व भविष्य खराब करून त्याला संधीच न देणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,गौतमी पाटील ह्या महाराष्ट्रातील मराठी कलावंत आहेत आणि जर त्या आपल्या नृत्यामध्ये मर्यादा बाळगून कार्यक्रम करणार असतील तर केवळ माणगांव किंवा रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गौतमी पाटील यांच्या पाठीशी मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांचे संरक्षण करेन.दरम्यान गौतमी पाटील यांनी अतिशय नेटका व पारंपारिक पद्धतीने लावणी डान्स सादर करून तमाम माणगांवकरांची मने जिंकली,अनेक लहान मुले, महिला या त्यांच्यासोबत नृत्य करण्यात सहभागी झाल्या होत्या.यावेळी नागरिकांची प्रतिक्रिया घेतली असता सौ.अनिता पवार यांनी सांगितलं कि आम्ही सगळ्या महिला या गौतमी पाटील यांना बघण्यासाठी आलेलो आहोत कारण त्या आज संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत,त्या आता जिथे कार्यक्रम करतात तो कार्यक्रम संपूर्णपणे पारंपरिक असतो त्यामुळे गौतमी पाटील यांना माणगांवमध्ये बोलावल्याबद्दल निलेश थोरे यांचे मनःपूर्वक आभार मानते.प्रसंगी छावा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,सदस्य व नागरिक उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट