!!! गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात डोंबिवलीत शिवसेना उबाठा गटातर्फे निषेध आंदोलन!!

दि१८ डोंबिवली ठाणे
विश्वनाथ शेनोय





दिवसेंदिवस महागाई आणि बेरोजगारी वाढत होत असल्याने, अशातच गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, CNG दरात झालेल्या भरमसाठ दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरें गटाचे जिल्हाप्रमुख दिपेशजी म्हात्रे यांच्या आदेशाने व शहरप्रमुख प्रकाशभाऊ तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक १८ रोजी सायं ०६.०० वाजता, शिवसेना डोंबिवली (पश्चिम) शहर शाखेतर्फे डोंबिविली (पश्चिम) रेल्वे स्टेशन मच्छिमार्केट* समोर चुलीवर भाकरी भाजून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये
कल्याण जिल्हाप्रमुख दीपेशजी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना डोंबिवली शहर आयोजित शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे उपशहर प्रमुख सुरज पवार संजय पाटील सुरेश परदेशी विभाग प्रमुख शाम चौगले प्रमोद कांबळे नितीन पवार राजेंद्र सावंत सुनील पवार अंकुश सूर्यवंशी सुप्रिया चव्हाण प्रियंका विचारे अनिल मुथा सुरेखा सावंत अर्चना पाटील लक्ष्मी कांबळे सानिका खाडे सायली जगताप दांडगे नीलिमा विश्वासराव रेश्मा सावंत भाग्यश्री चव्हाण सर्व महिला आघाडी व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.