गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमानी कुटुंबाला ऑटो रिक्षात विसरलेले दागिने व इतर सामान परत मिळवून दिल्यामुळे टिळक नगर पोलीसांवर कौतुकांचा वर्षाव…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:

टिळक नगर पोलीस ठाणे

  दिनांक 18/09/2023 रोजी रात्रौ 10.00 वाजता चे सुमारास फिर्यादी नामे राजेश येद्रे यांनी पोलिस ठाण्यास येऊन कळविले की ते त्यांच्या पूर्ण कुटुंबासह त्यांच्या  गावी रत्नागिरी येथे गणपती उत्सवाकरिता जाण्यासाठी विद्याविहार पूर्व ते एलटीटी टर्मिनस येथे जाण्यासाठी नटराज बार येथून रिक्षा पकडली होती. टर्मिनस येथे उतरते वेळी त्यांच्या दोन बॅगा ज्यामध्ये जवळ जवळ 04 तोळ्याचे दागिने व रोख रक्कम असलेल्या त्या रीक्षामध्ये विसरल्या होत्या. 

गुन्हे प्रकटीकरण पथकास तत्काळ बंदोबस्त ठिकाणाहून बोलावून घेऊन फिर्यादी व ठाणे अंमलदार यांच्याकडून माहिती प्राप्त करून सदर ठिकाणावरील शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच शासकीय कॅमेरा मध्ये सदरची ऑटो रिक्षाचा क्रमांक हा समजून येत नसल्याकारणाने सदर ठिकाणी जाऊन प्रायव्हेट सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली. परंतु ऑटो रिक्षाचा क्रमांक हा काही समजून येत नव्हता त्यानंतर ऑटो रिक्षा वरील ओळखीच्या खुणांची माहिती घेऊन टिळक नगर व पंतनगर पोलीस ठाणे हद्दीतील ऑटो रिक्षा पार्किंग चालवणाऱ्या इसमांकडे जाऊन चौकशी केलेली होती.

दिनांक 19/09/2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक हे पोलिस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त करीत असताना सदर ओळखीच्या खुणा असलेली एक ऑटो रिक्षा  आर.एस. मनी कॅफे कडे जाणाऱ्या  रोडच्या बाजूला पार्क असलेली दिसून आली. सदर रिक्षा ची माहिती प्राप्त करून त्याचे चालकाशी संपर्क करून त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने फिर्यादी यांच्या विसरलेल्या दोन्ही बॅग त्याच्याजवळ असल्याचे सांगितले. लागलीच पथकासह रिक्षा चालकाचे घरी जाऊन त्याच्याकडे असलेल्या फिर्यादी यांच्या बॅगा ताब्यात घेतल्या व फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून यातील मुद्देमाल योग्य प्रकारे असल्याबाबत खात्री करून घेतली.

हस्तगत मालमत्ता

१) कि.अं.१,२०,०००/- चे सोन्याचे मंगळसूत्र

२)कि.अं. २५००० /- ची एक जोड सोन्याचे कर्णफुले

३)कि.अं. ३०००० /- चे एक जोड सोन्याचे कानावरील पट्ट्या

४)कि.अं.४०,०००/- ची एक जोड सोन्याचे कानातील कर्णफुले साखळी सहित.

५) किं.अं. ८००० /- ची सोनीची नथ.

६) रोख रक्कम -२४०० रुपये मात्र.

एकूण हस्तगत मालमत्ता -२,२५४०० /- रुपये किमतीची.

सदर कामगिरी मध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे
पो. ह.साटेलकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे
यातील फिर्यादी यांना सदर बाबतची माहिती दिली असता त्यांनी वापोनी साहेब व संपूर्ण टिळकनगर व मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत..

फिर्यादी हे गावी असल्याने ते गावाहून आल्यावर त्याच्या वस्तू त्यांचे ताब्यात देत आहोत.

सदरची कामगिरी ही मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बागुल साहेब व पोनी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पडली आहे.

गुन्हे प्रकटीकरण पथक :-
सपोनि राहुल वाघमारे
पोउनि राठोड
पोहवा. संजय शिंदे
पोहवा. सत्यवान साटेलकर
पोहवा.अंबादास सानप
पोशि. किशोर रोंगटे
पोशि. गणेश गायकवाड

अशी माहिती
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
टिळकनगर पोलिस ठाणे, मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट