गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील 8 आरोपींना अटक

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

कोल्हापूर

एकूण 41 किलो गांजा व गांजा वाहतुक करणेसाठी वापरलेल्या 02 चार चाकी, 01 बुलेट, 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी.

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधीकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन अवैद्य व्यवसाय तसेच अंमली पदार्थाचे अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हातकणंगले ते कुंभोज जाणारे रोडवर नेज गावचे हद्दीत दोन इसम महिंद्रा बोलेरो गाडीतून इचलकरंजी येथील इसमांना गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती.

मिळाले बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हातकणंगले ते कुंभोज जाणारे रोडवर नेज येथे सापळा लावून गांजा विकत घेणारे 1) दिपक दत्तात्रय पुजारी, वय 37, व्यवसाय-स्क्रॅप, रा. सांगली नाका, इचलकरंजी, 2) विवेक मेघदुत शिंदे, वय 28, व्यवसाय-फळविक्री, रा. मंगळवार पेठ, गांधी पुतळा, इंचलकरंजी व गांजा विक्री करणेकरिता आलेले 3) अंकुश प्रताप शिंदे, वय 30, व्यवसाय-मजुरी, 4) नंदकिशोर भिकु साठे, वय 30, व्यवसाय चालक, दोघे रा. बामणी, ता. खानापुर, जि. सांगली यांना पकडून त्यांचे कब्जातून 21 किलो 070 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 01 महिंद्रा बोलेरो गाडी व 01 बुलेट गाडी तसेच 05 मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 16 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला. त्यांचे कब्जात मिळालेला गांजा कोठुन आणला याबाबत त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवून तपास केला असता इसम नामे विवेक शिंदे व नंदकिशोर साठे यांनी सदरचा गांजा खरसुंडी, जिल्हा सांगली येथुन आणला असलेचे सांगीतले. त्यांचे माहितीने खरसुंडी ता. आटपाडी, जिल्हा सांगली येथे जावून इसम नामे

5) मनोज मदन गोसावी, वय 29, व्यवसाय शेती, रा. महादेव नगर अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापुर, 6) राजु अमिन शेख, वय 30, व्यवसाय- गुरेपाळने, रा. कृष्णप्रिया नगर अकलुज, ता. माळशिरज, जि. सोलापुर 7) महेश जम्मु साळुंखे, वय 32, व्यवसाय-पुजारी, रा. खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली,

8) देवदास महादेव तुपे, वय 21, व्यवसाय चालक, रा. पालवण चौक पालवण, ता. दहिवडी, जि. सातारा यांना पकडून त्यांचे कब्जातून 20 किलो 125 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 01 टाटा झेस्ट गाडी, 05
मोंबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 14 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला.

वरील प्रमाणे गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील 08 इसमांना पकडून त्यांचेकडून तब्बल 41 किलो 195 ग्रॅम गांजा तसेच गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 01 महिंद्रा बोलेरो, 01 टाटा झेस्ट, 01 बुलेट अशी वाहने, 09 मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 30 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. नमुद इसमांचे विरुध्द हातकणंगले पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाणे करवी सुरू आहे.

सदरची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मा. श्री. योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, संतोष बरगे, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अशोक पोवार, गजानन गुरव, महादेव कुराडे, राजेश राठोड, हंबीरराव अतिग्रे व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट