गांजा विक्री करणाऱ्या अब्दुल रशीद वर स्था. गुन्हे शाखा अमरावतीची कार्यवाही

0
WhatsApp Image 2025-05-12 at 5.26.46 AM
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अमंली पदार्थ विक्रीचे अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधधंदयांना आळा बसावा करीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दि. ०९/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पो.स्टे. सरमसपुरा हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना विश्वनिय गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, अब्दुल रफिक अब्दुल रशिद रा. तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार त्यांचे राहते घरी अवैधरित्या गांजा (अंमली पदार्थ) ची विक्री करीत आहेत.

अशा खबरेवरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने N.D.P.S कायदयाचे कार्यवाही नियमावली प्रमाणे राजपत्रित अधिकारी, दोन शासकिय पंच यांचे समक्ष गोपनिय खबरेप्रमाणे अब्दुल रफिक अब्दुल रशिद वय ७२ वर्ष रा. तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार याचे घराचे झडतीत १ किलो ८३४ ग्रॅम कि.अं. ३६,६८० रुपयाचा गांजा (अंमली पदार्थ) मिळुन आला.

आरोपीकडुन एकुण ०१ किलो ८३४ ग्रॅम कि.अं.३६,६८०/- रुपयाचा गांजा (अंमली पदार्थ) मिळुन आल्याने सदरचा गांजा माल रितसर जप्त करुण आरोपी ताब्यात घेण्यात येवुन त्यांचे विरुध्द अपराध क्र. १३०/२०२५ कलम ८ (क), २० (ब), ii (ब) N.D.P.S कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला पुढील तपासकामी पोलिस स्टेशन सरमसपुरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा., मा. श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचीन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंन्द्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक प्रज्वल राउत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट