गांजा विक्रेता २ परप्रांतीय इसमांना कोल्हापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर :

गांजा अंमली पदार्थाची कोल्हापूर येथे बेकायदेशीर विक्री करणेसाठी आलेल्या दोन परप्रांतीय इसमांना कोल्हापूर पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. १० किलो वजनाचा २,००,०००/- रु. किंमतीचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी.

मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, यांनी अवैद्य व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मोरेवाडी चौक, हॉटेल ड्रीमलॅन्ड जवळ दोन परप्रांतीय इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम सँग घेवून व एक इसम प्रवासी बॅग घेवून मोरेवाडी चौक, हॉटेल ड्रीमलॅन्ड जवळ येवून थांबले त्यांच्या हालचाली संशयास्पद असलेने व मिळाले बातमीची खात्री झालेवर पथकाने त्यांचेवर छापा टाकुण त्यांना पकडले.

त्यांना नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी त्यांची नावे १] कैलाससिंह उदयसिंह राजपूत, वय २२ वर्षे, २] किशनसिंह दौलतसिंह राजपूत, वय २१ वर्षे, दोघे रा. जालोकी मंदार, पोष्ट/तहसिल खमनोर, जिल्हा राजसमंद, राज्य राजस्थान अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडील सँग व प्रवासी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला एकूण १० किलो वजनाचा २,००,०००/- रूपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ व २०,०००/- रूपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २,२०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. राजारामपूरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही इसमांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास राजारामपूरी पोलीस ठाणे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, प्रविण पाटील, परशुराम गुजरे, संतोष बरगे, गजानन गुरव, अशोक पोवार, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, राजु येडगे, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे, नामदेव यादव, महादेव कुराडे व सुशिल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट