उमदी पोलीस ठाणे हद्दीत कांद्याच्या शेतामध्ये गांजाची शेती करणारा इसम जेरबंद आरोपीकडून १७० गांजाची झाडे (१३६ किलो गांजा) असा अंदाजे १३,६८,६५० रु. चा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :- ०२ अरोपींवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे गु.घ.ता वेळ :- २५.११.२०२३ रोजी गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८क, २० (ब), २२,२९ प्रमाणे , गु.घ.ता वेळ :- २५.११.२०२३ रोजी

फिर्यादी नाव :- इंद्रजित विठ्ठल घोदे, पोकों ५५६, नेम उमदी पोलीस ठाणे, सांगली , याना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.सपोनि संदीप शिंदे, उमदी पो. ठाणे कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे सर यांचे मार्गदर्शानाखाली

१) सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे
२) पोउपनि शिरीष शिंदे आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, इंद्रजित गोदे, चापोकॉ सोपान भंडे, नितीन खोंडे

                               आरोपीचे नाव पत्ता

१. सिकंदर बगसु कोतवाल, वय ५०, रा. कोतवालवस्ती, गिरगाव, ता. जत, जि. सांगली.

२. उस्मान बगसु कोतवाल, वय ५०, रा. कोतवालवस्ती, गिरगाव, ता. जत, जि. सांगली.

                           ताब्यात दिनांक २५.११.२०२३ रोजी
                                                               
गुन्हयातील जप्त मुद्देमाल  १३,६८,६५०/- रु. किं. एकुण १२७ गांजाची हिरवी झाडे, पाने, फांदी, खोडासह त्यांचे एकुण वजन अंदाजे १३६ कि. ८६५ ग्रॅम असे.

१३,६८,६५०/- रु. असा (एकुण तेरा लाख अडुसष्ठ हजार सहाशे पन्नास रु. फक्त )

           मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील अवैध गांजा विक्री व लागवड करणारे इसमाचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करुन गुन्हे दाखल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.       
            सदर सुचनेप्रमाणे मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितु खोखर व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत, श्री सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उमदी पोलीस ठाणेयांनी हद्दीतील बातमीदारांना सुचना दिल्या होत्या.

               दि.२५.११.२०२३ रोजी सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उमदी गावाचे हद्दीतील गिरगाव गावाचे हद्दीतील कोतवाल वस्तीवरील इसम नामे सिकंदर बगसु कोतवाल व उस्मान बगसु कोतवाल यांनी त्यांचे शेतातील कांद्याचे पिकात गांज्याचे झाडाचे लागवड केलेली आहे, गुप्त बातमीदारामार्फत अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी श्री साळुंखे साो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो जत विभाग जत यांना फोनवरून कळवुन त्यांनी रेडकामी परवानगी दिल्याने, सपोनि संदीप शिंदे, पोउपनि शिरीष शिंदे व वरील नमुद स्टाफ असे कोतवाल वस्ती गिरगाव येथे रेडकामी रवाना होवून कोतवालवस्ती येथुन उत्तरेकडे सुमारे ५०० मीटर अंतरावर लपून चालत जावुन पाहिले असता सदर ठिकाणी कांद्याचे पिकाजवळ एक इसम उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याचेजवळ जावुन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सिकंदर बगसु कोतवाल, रा. कोतवाल वस्ती, गिरगाव, ता. जत असे सांगितले. तसेच त्यास सदर ऊसाचे पिकाचे शेत कोणाचे आहे असे विचारले असता त्याने सदरचे शेत हे माझे मालकीचे त्यांचा जमीन गट नंबर ३६ / २१ असा असलेचे सांगुन सदरचे कांद्याचे पीक मी स्वता लावलेले असलेबाबत सांगितले. सदर ठिकाणी सुमारे सहा ते सात फुट उंच असले ऊसाचे शेताताचे बांधावर | नमुद सर्व स्टाफने दोन पंचासमक्ष शोध घेतला असता शेतात व आजुबाजुस कोणास दिसु नये अशा पद्धतीने ठिक- | ठिकाणी गांजाचे हिरव्या रंगाचे ओलसर पानांची व उग्रवासाचे ६ ते ७ फुट उंचीचे झाडे लावल्याचे दिसुन आले. सदर | झाडांचे पानांचा सपोनि संदीप शिंदे यांनी चुरगळुन वास घेतला असता त्या पानांचा गांजाचा उग्र वास आला. तसेच सदर शेतापासुन १०० मीटर अंतरावरील बाजुस असलेल्या शेतात शोध घेतला असता आरोपीचे भाऊ सिकंदर बगसु | कोतवाल यांचे शेतात देखील गांजाची शेती केली असल्याचे दिसुन आले. सदर सर्व झाडे गांजाची असल्याची खात्री | झाल्याने सदर शेतातील १७० गांजाची झाडे उपटुन काढून शेतामध्ये वजन काटयावर एकत्र वजन केले असता सदर गांजाच्या हिरव्या झाडांचे अंदाजे वजन १३६ किलो ८६५ ग्रॅम इतके मिळून आले. सदर गांजाचे बाजार भावाप्रमाणे | मुल्य अंदाजे १३,६८,६५०/- रु. एवढे असल्याचे आरोपीने सांगीतले आहे. यातील आरोपींवर उमदी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि शिरीष शिंदे, उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

                     मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर यांनी | दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या अवैध कामांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट