गांजा अंमली पदार्थाची कोल्हापूर येथे बेकायदेशीर विक्री करणेसाठी आलेल्या इसमास स्था.गुन्हे शाखा कोल्हापूर यानी केले जेरबंद..

सह संपादक – रणजित मस्के
कोल्हापूर ; ७ किलो ८९ ग्रॅम गांजा व मोटर सायकल असा एकूण २,१७,७२५/- रूपयेचा माल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी.मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, यांनी अवैद्य व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मनोरा हॉटेल, स्वाधार नगर येथे एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम स्प्लेंडर मोटर सायकलवरून प्लॅस्टिकचे पोत्यामध्ये गांजा भरून शेंडा पार्ककडून हॉकी स्टेडीयमकडे जात असताना मिळाले बातमीची खात्री झालेवर पथकाने त्यास छापा टाकून पकडले.सदर इसमास नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून विचारले असता त्याने त्याचे नावे सुरज सुभाष चव्हाण, वय २४ वर्षे, रा. राजारामपूरी १४ वी गल्ली, दौलत नगर, कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडील प्लॅस्टिक पोत्याची दोन पंचा समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला एकूण ०७ किलो ८९ ग्रॅम वजनाचा १,७७,२२५/- रूपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ, ४०,०००/- रूपये किंमतीची स्प्लेंडर मोटर सायकल व ५००/- रूपये रोख रक्कम असा एकूण २,१७,७२५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. राजारामपूरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इसमास अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास राजारामपूरी पोलीस ठाणे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, परशुराम गुजरे, अशोक पोवार, संतोष बरगे, अरविंद पाटील, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, अनिल जाधव, हंबीरराव अतिग्रे, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.