गंगापुर पो.स्टे. च्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नाशिक : – गंगापुर पोलीस स्टेशन १) गु.र.नं. ५९/२०१७ भा.द.वि, ३०७, ३२३, ५०४, ३४ २) सातपुर पो. | स्टे. गु.र.नं. ५६ / २०१५ भा.द.वि. ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे, ३) गंगापुर | पो.स्टे. गु.र.नं. २४६ / २०१९ आर्म अॅक्ट १३५ प्रमाणे, या गुन्हयातील हद्दपार इसम मयुर उर्फ संतोष गजानन वांद्रेकर, वय २४ वर्षे, हा कोमल स्वीट शिवाजी नगर नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर | बातमी गुप्त बातमीदारा मार्फत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार पोना ५६१ / योगेश चव्हाण व | पोलीस अंमलदार पो.शि. ६३६ मंगेश जगझाप यांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोमल स्वीट शिवाजी नगर येथे सापळा लावुन हद्दपार आरोपी मयुर उर्फ संतोष गजानन वांद्रेकर, वय २४ वर्षे, व्यवसाय- भांडे दुकान, रा. यशोधन डी, रूम नंबर १, म.न.पा. शाळेच्या जवळ, शिवाजीनगर, नाशिक यास कोमल स्वीट | शिवाजीनगर नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी गंगापुर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त साो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा. श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली | खंडणी विरोधी पथकातील पोनि. विदयासागर श्रीमनवार, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि. दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, पो.ना. योगेश चव्हाण, पो. ना. दत्तात्रय चकोर पो. अंमलदार भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव, स्वप्नील जुंदे, विठ्ठल चव्हाण व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट