गंगाझरी पोलीसांनी अवैधरीत्या निर्दयतेने गोवंशीय जनावरांना बंधिस्त करून वाहतूक करणाऱ्यांवर धडक करवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया : गंगाझरी पोलीसानी गुन्हा दाखल करून एकुण 11 गोवंशीय जनावरे/गाई- बैल, महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकुण 5,70,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,आगामी कालावधीत येणारा गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

        या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गंगाझरी पोलीसांची अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.

            या अनुषंगाने दिनांक 30/08/2023 रोजी पोलीस स्टेशन - गंगाझरीचे पोलिसांना खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की चंगेरा येथून एका महिंद्रा बोलेरो पिकअप अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरे कोंबून ती कत्तलीकरिता गंगाझरी मार्गे नागपूरकडे नेणार आहेत. तसेच सदर जीपच्या समोर एक पांढऱ्या रंगाची किया कार ही रेखी करण्याकरीता असणार आहे. त्या आधारे पो. स्टे. गंगाझरी येथील पोलिसांनी सैलानी ढाबा, मजितपुर, ता.जि. गोंदिया येथे नाकाबंदी लावली. रात्री 01.30 वा. च्या सुमारास गोंदिया कडून तिरोड्याच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची किया कार येताना दिसली असता गणवेशातील पोलिसांनी त्या कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु त्या कारच्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही अतिशय वेगाने, बेदरकारपणे व धोकादायकरीत्या चालवून पोलिसांनी इशारा देऊन सुद्धा न थांबता तिरोड्या च्या दिशेने निघून गेली. त्यानंतर लगेचच गोंदिया कडून एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 40 बी एल 9841 ही  जीप येताना दिसल्याने पोलिसांनी त्या वाहनाला सुद्धा थांबण्याचा इशारा केला. परंतु त्या वाहनाच्या चालकाने काही अंतर अगोदरच जीप थांबवून तो जीपमधून उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्या जीपची पाहणी केली असता, पोलिसांना सदर जीपच्या डाल्यामध्ये एकूण 11 गोवंश जनावरे मिळून आली. सदरची 11 गोवंश जनावरांची अवैधरीत्या निर्दयतेने, चाऱ्या पाण्या विना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी सदरची जीप व त्यातील 11 गोवंश जनावरे असा एकूण 5,70,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

               11 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी महिंद्रा बोलेरो पिकअप चा चालक तसेच किया कारचा चालक यांचेविरुध्द पोलीस ठाणे गंगाझरी येथे अप.क्र. 349/2023 भारतीय दंड विधान कलम 279, 34 सह कलम 11(1),(ड)(इ) प्रा.छ.प्रति. अधि. सह कलम 5, 6, 9 महा. पशु संवर्धन अधि. 1967 सह कलम 184, 239/177 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन गंगाझरी येथील पोलीस करीत आहेत. 

         सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो. नि. महेश बनसोडे,पो.उप.नि.पराग उल्लेवार, पो.हवा. राकेश भुरे, उमेश कावळे, चा.पो.हवा. तुळशीदास पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, हरीश कटरे, पो.शि. श्रीकांत नागपुरे, प्रशांत गौतम, हरीकिशन भेलावे, ललित गुप्ता यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट