हातभट्टीची दारू काढणाऱ्यावर गंगाझरी पोलीसांची बेधडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- 🎯 पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना गोंदिया जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते…

या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात येत आहे…. मा. वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा, श्री. प्रमोद मडामे, पो.स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. श्री. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध आणि गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ….

पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अंमलदार यांनी दिनांक – 05/12/ 2023 रोजी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा शहारवाणी, ता. गोरेगांव, जि. गोंदिया येथील शेतशिवार परिसरात जमिनीत खड्डा खोदून त्याची चूल तयार करून, त्या चुलीवर मोठी जर्मन करची व त्यावर एक मोठे जर्मन ठेवून मोहाफुलाची हातभट्टी दारू काढत असल्याचे मिळून आले. सदर ठिकाणी पोलिसांनी रेड कार्यवाही करून घटनास्थळावरून 02 जर्मन करची, 01 लाकडी टवरा, एक प्लास्टिक पाईप, 300 किलो सडवा मोहपास प्लास्टिक पोतडीतील सडवा मोहोपास 8 टिनाचे पिपे, 60 लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू असा एकूण 36,500/- रुपयेचा माल मिळुन आला.

*सदर प्रकरणी पो.स्टे. गंगाझरी येथे
1) अविनाश माणिकचंद मौजे, वय 21 वर्ष, रा. मौजा शहारवाणी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांचेविरुद्ध अपराध. क्र. 486/2023 कलम 65(ब) (क)(ड)(ई )(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला

   सदरची कारवाई  मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गंगाझरीचे पो.नि. श्री. महेश बनसोडे,  पोना महेंद्र कटरे/1706, पोशि प्रशांत गौतम/1093 यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट