गंगाझरी पोलीसांनी अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी 2 इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करुन 20 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🎯 मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी नवरात्र उत्सव व छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा, श्री. प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. श्री. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध व गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध कारवाईची मोहीम
राबविण्यात येत आहे .
या अनुषंगाने पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दिनांक 16/10/2023 रोजी नवरात्र उत्सव निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी 17.10 वा. चे सुमारास मौजा बोरा ते डब्बेटोला रोडवर, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इसमास टिप्पर क्रमांक एमएच 40 सीडी 0562 सह पकडले.
सदर प्रकरणी पो. ठाणे गंगाझरी येथे ट्रॅक्टर चालक नामे
1) साहिल नवाज अली सय्यद, वय 23 वर्षे, रा. काचेवाणी, ता. तिरोडा, जि. गोंदिया व मालक नामे सौरभ होमेंद्रसिंग चौव्हाण, वय 35 वर्ष, रा. ता. तिरोडा, जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे अपराध. क्र. 418/2023 कलम 379, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून वरील नमूद आरोपी याचे ताब्यातून 1) एक टिप्पर क्र. एमएच 40 सीडी 0562 किंमत 20 लाख रु. व त्यामध्ये रेती 05 ब्रास रेती किंमत 25 हजार रु. एकूण किंमत 20 लाख, 25 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दिनांक 06/10/2023 रोजी वर नमूद टिप्पर व नमूद दोन्ही आरोपींवर पोलीस स्टेशन तिरोडा येथे रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. श्री. महेश बनसोडे, पोउपनि पराग उल्लेवार यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गंगाझरी येथील सुनील अंबुले, पोहवा सुभाष हिवरे, चापोहवा तुळशीदास पारधी, पोना महेंद्र कटरे, पोशि प्रशांत गौतम यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com