गंगाझरी पोलिसांची कारवाई – गुन्हा करण्याच्या उद्देशाने रोडच्या कडेला अंधारात घरफोडीच्या साधनासह लपून बसलेल्या इसमाकडून चोरीची मोटर सायकल व मंदिराच्या दानपेटीतून चोरलेली रोख रक्कम हस्तगत….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

➡️ याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रात्रीच्या वेळी सतर्कपणे गस्त करून गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

      त्या अनुषंगाने तिरोडा विभागीय गस्तदरम्यान तो ठाणे गंगाझरीचे पोनि महेश बनसोडे व स्टाफ यांना दिनांक 23.09.2023 रोजी पहाटे 04.00 वा. च्या सुमारास सुखदेवटोली बस स्टॉप जवळ, गोंदिया तिरोडा रोड, ता.जि. गोंदिया येथे  अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला इसम नामे आशिक रेखलाल राऊत, वय 19 वर्ष, ता.जि. गोंदिया हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एम एच 35 एच 2440 सह संयशीतरित्या थांबलेला मिळून आला. पोलिसांनी त्याचेकडे विचारपूस करून त्याला त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता, त्याला त्याचे नीट कारण सांगता आले नाही. तसेच त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्यांने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता,  सदरची मोटर सायकल त्याने पो स्टे रामनगर हद्दीतील कुडवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील एका घरासमोरून चोरल्याचे सांगितले. तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 1,072/- रुपयाची चिल्लर तसेच एक स्क्रू ड्रायव्हर व लोखंडी सळई मिळून आली. त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पो स्टे रामनगर हद्दीतील कुडवा येथील गोंडीटोला रोडवरील शिवमंदिर मधील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरल्याचे सांगितले. यावरून त्याच्याकडून त्याच्या ताब्यातील नमूद मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण 21,120 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमाविरुद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अप. क्रमांक 380/2023 म.पो.का.कलम 122,124, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा पोलीस ठाणे गोंदिया शहर, पोलीस ठाणे गोरेगाव व पोलीस ठाणे भंडारा या ठिकाणी मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

              सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, चा.पो.हवा. तुळशीदास पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. प्रशांत गौतम यांनी केली...

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट