दिनांक ७ ते १७ सप्टें. २०२४ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात प्रमाणात साजरा…

0
WhatsApp Image 2024-10-08 at 4.28.19 PM (1)
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :- सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणेबाबत गणेश मंडळांना अवाहन केले होते. गणेश उत्सव मंडळांना एक गाव एक गणपती-२० गुण व एक वार्ड एक गणपती ध्वनी प्रदुषण रहित (डॉल्बी/डिजे विरहीत) -३० गुण, अटी व शर्थीचे पालन-३० गुण, पर्यावरण पुरक मुर्ती-१० गुण, देखावा शिस्त-१० गुण असे गुणांकनाचे मुद्दे देण्यात आलेले होते.

सदर स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हयातील सर्व ६-पोलीस उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती, सदर समितीमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महसुल विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील अधिकारी, सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.

सदर स्पर्धेत खालीलप्रमाणे गणेश मंडळांचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांचा आज दि.०८.१०.२०२४ रोजी ११.०० ते ११.५० या वेळेत सर्व विभागातील प्रत्येकी ३ प्रथम क्रमांक, व्दीतीय, तृतीय क्रमांक अशा जिल्हयीतल एकूण १८ गणेशोत्सव मंडळांना मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडून पारितोषिक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

उपविभाग पोलीस ठाणे
सांगली

विश्रामबाग संजयनगर

सांगली शहर

मिरज

मिरज शहर

एमआयडीसी

मिरज ग्रामीण

तासगाव

भिलवडी

तासगाव

कुंडल

इस्लामपूर

शिराळा

कोकरूड

विटा

विटा

इस्लामपूर

जत

आटपाडी

जत

कवठेमहांकळा

उमदी

गणेश मंडळाचे नाव व ठिकाण

सांगली कॉलेज कार्नर क्रिडा व सांस्कृतीक मंडळ, सांगली

रामरहिम गणेशोत्सव मंडळ, चिंतामणीनगर

खोकी संघटना गणेशोत्सव मंडळ, सांगली

श्री. महात्मा गणेश उत्सव मंडळ मिरज

बाल गणेशोत्सव मंडळ अहिल्यानगर कुपवाड

शिवराज गणेशोत्सव मंडळ रसुलवाडी

सिध्देश्वर गणेशोत्सव मंडळ, अंकलखोप ता. पलूस

सिध्देश्वर कला व क्रिडा सांस्कृतीक मंडळ पाडळी

ता. तासगाव

कुंभेश्वर मित्र मंडळ कुंडल, ता. पलूस

श्री.ए वन कला उत्कृष गणेश मंडळ शिवरवाडी ता. शिराळा

शिवशंभो गणेश मित्र मंडळ, मोहरे ता शिराळा

जय हनुमान गणेश मंडळ, इस्लामपूर

तिरंगा गणेशोत्सव मंडळ विटा ता.विटा

क्रांती गणेश कला क्रिडा मंडळ दिघंची ता. आटपाडी

अष्टविनायक गणेश मंडळ तडसर ता. कडेगाव

श्री. गंधर्व गणेश कला व क्रिडा व्यायाम मंडळ जत

अकरा मराठा हनुमान मित्र मंडळ अग्रण धुळगाव

श्री. संत बाळुमामा सेवाभावी प्रतिष्ठान कुलाळवाडी ता.जत

सदर पारितोषिक वितरण सोहळ्याकरीता उपविभागीय अधिकारी, शहर विभाग श्रीमती विमला एम, उपविभागीय अधिकारी मिरज श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय अधिकारी, इस्लामपूर श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, विटा श्री. विपुल पाटील, उपविभागीय अधिकारी, जत श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय अधिकारी तासगांव श्री. सचिन थोरबोले यांचेसह जिल्हयातील सर्वे पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट