गणेशोत्सव, ईद- ए – मिलाद सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांचे अध्यक्षतेत, आणि पोलीस अधीक्षक, श्री. गोरख भामरे, यांचे उपस्थितीत जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- गणेशोत्सव आणि ईद- ए- मिलाद सण- उत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक – 07/09/2024 रोजी 11.00 ते 12.30 वा. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील बैठक दालनात जिल्हाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील सर्व गणमान्य सुजाण प्रतिष्ठित नागरिक, हिंदू- मुस्लिम समाज बांधव, मंडळ पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांची जिल्हास्तरीय सर्वसमावेशक अश्या बैठकीचे आयोजन करण्यात येवून शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली.



सदर जिल्हास्तरीय शांतता बैठकीमध्ये गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद यासारखे सण अतिशय उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे शांतता अबाधित राखून पार पाडण्यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली…त्यात प्रामुख्याने मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी खालील मुद्याचे अनुषंगाने विचार मांडलेत —

1) मागील कालावधी.. गतवर्षी नुसार सर्व समाज बांधव यांनी अतिशय उत्साहाने सौहार्दपुर्ण, शांततामय वातावरणात धार्मिक सण उत्सव साजरे केले असल्याने यावर्षी सुध्दा गणेश उत्सव तसेच ईद-ए- मिलाद उत्सव अतिशय उत्साहाने सौहार्दपुर्ण, शांततामय वातावरणात साजरा करावेत.

2) स्थानिक प्रशासन (पोलीस विभाग, तालुका प्रशासन, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, धर्मदाय ईत्यादी ) कडून रीतसर परवानगी घेवूनच मंडप उभारणी, बांधकाम, मिरवणूका काढण्याबाबत तसेच जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे निर्देश आवाहन करण्यात आले..

3) मूर्तीची प्रतिष्ठापना करतांना किंवा मूर्ती विसर्जनाला घेवून जातांना…मिरवणूक, विसर्जनाच्या वेळी कुठलीही अप्रिय घटना घडून येणार नाही याची मंडळ पदाधिकारी. कार्यकर्ते, प्रशासनाने काळजी घ्यावी… स्वयं सेवक नेमावे..

4) गणेश उत्सव दरम्यान काळात मुस्लिम धर्मीय बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सव साजरा होणार असल्याने जिल्ह्यातील हिंदू व मुस्लिम समाज बांधवांनी आपसी सामंजस्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून उत्सव साजरा करावा…..कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी..

5) उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता प्रशासनाशी समन्वय साधून स्वतः मंडळ पदाधिकारी यांनी बाळगावी.

बैठकीत उपस्थीत गणमान्य प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, वरीष्ठ नागरीक, राजकीय व्यक्ती यांनी सुध्दा उत्सवाच्या अनुषंगाने खालील मुद्दे विचार मांडलेत–

1) नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी शहरातील मुख्य रस्ते यावर पडलेले खड्डे बुजवून घ्यावीत.. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरे गाय, कुत्रा, डुकरे, यांची व्यवस्था करण्यात यावी.

2) डी.जे. व कर्ण कर्कश्य वाद्य वाजविणारे, यांनी मोठ्या आवाजात वाद्य वाजवणार नाहीत यावर प्रशासनाचे नियंत्रण असावे…..आवश्यक वेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डी.जे. चालक मालक यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी..

3) विद्युत विभागाने उत्सव दरम्यान काळात वीज खंडीत होणार नाही तसेच विद्युत रोषणाई योग्य राहील कोठेही अंधार राहू नये याकरिता वेळीच आवश्यक उपाय योजना कराव्यात.

4) वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याप्रमाणे गणेश पेंडाल उभारण्यात यावे.. प्रशासनातर्फे बरिकेटिंग ची व्यवस्था करण्यात यावी..

5) कृत्रिम तलाव तयार करून विसर्जन करण्यात यावे… लहान गणेश मूर्ती शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जित करावे. नदीमध्ये विसर्जन दरम्यान होणाऱ्या अप्रिय घटना टाळाव्यात… इत्यादी विवीध बाबींवर चर्चा करून लक्ष वेधण्यात आले.

वरीलप्रमाणे उपस्थीत मुद्याचे अनुषंगाने आवश्यक उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याबाबत बैठकीत कळविण्यात आले….त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी, उपस्थीतांना उत्सव काळात पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले…

त्याच प्रमाणे सण- उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याबाबत तसेच जिल्हा पोलीस दलातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे तसेच प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. गणेश विसर्जन व ईद-ए- मिलाद हे सण साजरे करतांना यापूर्वीच ठाणे स्तरावर शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या बैठका दरम्यान दीलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी असल्याचे मत मांडले… शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे… यापुर्वी देखील प्रशासनाने सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष दिले जाईल तसेच सण उत्सव साजरे करीत असताना नविन पिढीपुढे चांगला आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी सर्वच समाजातील वरीष्ठ , प्रतिष्ठीत नागरिकांची असल्याचे मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले.*

सदर शांतता बैठकीस जिल्हाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर जिल्हाधकारी श्री. प्रवीण बेहरे, उपविभागीय दंडाधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद कमिटी व मंडळाचे विविध संघटनाचे पदाधिकारी, समाजसेवक व सुजान प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट