गणेश नाईक, पालकमंत्री, पालघर जिल्हा यांचे शुभहस्ते “सायबर सुरक्षित पालघर” या मोहिमेचा शुभारंभ

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, यांनी प्रशासन हे लोकभिमुख, गतिमान व पादर्शक पद्धतीने चालावे याकरीता, राज्यात १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमा अंतर्गत विशेष मोहिम हाती घेतलेली आहे. त्याच पार्श्वभुमीवर पालघर जिल्हा पोलीस दल लोकाभिमुख, गतीमान व्हावे व सामान्य नागरीकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणा-या सेवा वेळेत तसेच काही सेवा पोलीस ठाणेला न येताही मिळाव्यात या दुष्टीकोणातुन पालघर जिल्हा पोलीस दलाने वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेले आहेत.सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पालघर जिल्हयातील नागरीक सायबर गुन्हंयाना बळी पडु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंतर्गत ‘सायबर सुरक्षीत पालघर’ ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.आज दि.२३/०३/२०२५ रोजी सदर सायबर सुरक्षित मोहिमेचा शुभारंभ गणेश नाईक, मंत्री, वने तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा यांचे शुभहस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आला. सदर शुभारंभ कार्यक्रमास विष्णु सवरा, लोकसभा सदस्य, पालघर, दौलत दरोडा, विधानसभा सदस्य, राजेंद्र गावीत, विधानसभा सदस्य, शांताराम मोरे, विधानसभा सदस्य, विनोद निकोले, विधानसभा सदस्य, विलास तरे, विधानसभा सदस्य, हरिश्चंद्र भोये, विधानसभा सदस्य, गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर, भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीपक शिकारपुर, सायबरतज्ञ व लेखक हे उपस्थित होते. तसेच सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बांधव हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमा दरम्यान सायबर सुरक्षित पालघर ही चित्रफित दाखविण्यात आली. तसेच प्रमुख अतिथी डॉ. दीपक शिकारपुर, सायबरतज्ञ व लेखक यांनी उपस्थितांना सायबर गुन्हेबाबत माहिती देवून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गणेश नाईक, मंत्री, वने तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात “सायबर सुरक्षित पालघर” या पुस्तीकेचे व कॅलेंडरचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सायबर सुरक्षित पालघर मोहिमेअंतर्गत नागरीकांना सायबर साक्षर करण्यासाठी मदत करणे, सायबर संदर्भात जनजागृती करणे, तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, पोलीस व नागरीक यांच्या मधील दुवा म्हणून काम करण्यासाठी “सायबर योद्धे” तयार करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे संदर्भात जनजागृती व्हावी याकरीता चित्रकला स्पर्धा, रिल्स स्पर्धा, घेण्यात आल्या आहेत. सदर कार्यक्रमा दरम्यान उत्कृष्ट सायबर योध्दा ना तसेच स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सदरचा कार्यक्रम हा बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उपअधीक्षक (गृह), पालघर, विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, श्रीमती भगिरथी पवार, परि. पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरड प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक, रुपाली वर्तक गुंड, सायबर पोलीस ठाणे, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सायबर पोलीस ठाणे येथील सर्व पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट