नंदुरबार येथे गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेला दिला फाटा…

उपसंपादक – रणजित मस्के
नंदुरबार :
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशामुळे पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे-डॉल्बीला सर्वच गणेश मंडळांनी फाटा दिल्याचे दिसून आले. त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा गजर मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता.
डीजे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचा संकल्प पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी गणेश मंडळांना आवाहन केले होते. डीजे चालकांना देखील त्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठेही डीजेचा आवाज ऐकू आला नाही.

पारंपरिक ढोल-ताशांचा गजर सर्वत्र ऐकू येत होता. त्यामुळे भाविकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com