पालघर जिल्हा पोलीस दल अंतर्गत गणराया व ईद ए मिलाद पुरस्कार २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे जनसंवाद अभियान अंतर्गत गणराया पुरस्कार व ईद-ए-मिलाद पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा सोहळा दि. २९/०१/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व धर्म समभाव पालघर जिल्ह्यामध्ये २०२३ मध्ये अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव यांनी कुठलेही नियमाचे उल्लंघन न करता दोन्ही ही सण आनंदात व जल्लोशात साजरा करून सुव्यवस्था राखण्यात आली दोन्ही ही सणाला गाल बोट लागू नये याकरिता पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांच्या पोलीस नियोजनाने पालघर जिल्ह्या मध्ये सुव्यवस्था राखण्यात आली.

याकरिता हिंदू बांधव मुस्लिम बांधव यांनी ही सर्वांना सहकार्य केले याकरिता पालघर जिल्हा पोलीस दल त्यांचे धन्यवाद करत जनसंवाद अभियान अंतर्गत बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब पालघर मध्ये आल्यापासून सुव्यवस्था व निरनिराळ्या कार्यक्रमाचे अंतर्गत जनसंवाद करून पालघर मध्ये सुव्यवस्था राखण्याचा काम करत असतात असे त्यांचे मन भरून कौतुक करण्यात आले .

                 या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) तथा पालक मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब,  लोकसभा खासदार पालघर राजेंद्र गावित साहेब,  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेब ,मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद पालघर भानुदास पालवे साहेब , पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब ,पालघर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट साहेब व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील हिंदू बांधव व मुस्लिम बांधव व  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा डहाणू तालुकाच्या टीमला आमंत्रित करण्यात आले होते.

आमंत्रणाचे मान ठेवून डहाणू तालुकाध्यक्ष प्रसाद वझे साहेब , डहाणू शहर अध्यक्ष राहुल चौधरी साहेब, डहाणू तालुका सदस्य अगस्ती तामोरे साहेब , संजय दवणे साहेब व पत्रकार बंधू या कार्यक्रमला उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट