रात्री शेतकऱ्यांचे धान्य चोरणारी टोळी गजाआड तिघे अल्पवयीन, दोघे फरार ,दोघांना कोठडी…

उपसंपादक – रणजित मस्के
आळेफाटा:- आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान्य रात्रीचे वेळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपूर्वी सक्रिय झाली होती. या आठ जणांच्या टोळीतील पाच जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून यातील तिघे अल्पवयीन आहेत तर उर्वरीत तीन जणांनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
अनिकेत अशोक बंगाळे (वय २० रा. राजुरी, ता. जुन्नर), गणेश व्यंको फुलमाळी (वय १९ दोघे रा. राजुरी, ता. जुन्नर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे असून अल्पवीय तिघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर किरण ऊर्फ बॉडी शिंदे, ज्ञानेश्वर ऊर्फ आरडीएक्स वाव्हळ (दोघे रा. आळे, ता. जुन्नर), रोहण चव्हाण (रा. आळे, ता. जुन्नर, पूर्ण नाव माहीती नाही) हे गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपसह फरार आहेत. आरोपांनी आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हा केल्याचे कबूल करून या दाखल गुन्ह्यामध्ये राजुरी व आळे येथील एकूण ८ आरोपींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धान्य चोरीसाठी त्यांनी आळे येथील एका पिकअप (एमएच १४ केए ३७०९) व राजुरी येथील मोटारसायकल (एमएच १४ जेक्शयु (६९५८) चा वापर केला असून चोरीचे धान्य नगर जिल्ह्यात विक्री केल्याचे आरोपींनी सांगितले. दरम्यान, गुन्ह्यातील दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे पोलीस अधीक्ष रवीद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक निरीक्षक सुनिल बडगुजर, अनिल पवार, हवालदार विकास गोसावी, कॉस्टेबल प्रवीण लोहोटे, सचिन कोवल, नवीन अरगडे, पोलीस मित्र निलेश शितोळे यांच्या पथकाणे केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com