अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालून औषधे देणारी परजिल्हयातीलभोंदूगिरी करणारी गुन्हेगार टोळी गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा

तळबीड पोलीस ठाणे येथे दि. १६/८/२०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक सातारा याना माहिती मिळाली की मौजे तळबीड येथील एका दापंत्यास नारायण वाघ वैद्य नावाचे भोंदूगिरी करणारे कोणती वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना सदरची एक टोळी सातारा जिल्हयात कार्यरत आहे. म्हणून दिले माहिती नुसार संबंधीत दांपत्या बरोबर चर्चा केली तेव्हा त्याना नारायण वाघ वैद्य नावाचे वैद्याने दि.२१/७/२०२३ फोन वरून संपर्क साधून त्याना होत नसलेले अपत्य त्याचे औषधाने होवू शकते ते औषध मोफत देतो फक्त आमचे मठाची पावती ११००० रुपयाची पावती घ्यावी लागेल असे सांगून दांपत्याचा विश्वास संपादन करून त्याचे दिवशी चार लोक टाटा पंच कार नं एम.एम १८ बी. एक्स ४५६० या कारने येवून त्या दांपत्यास अपल्या बाबत औषध देतो परंतु ती औषध महाग आहेत तुमची तुम्ही आणा असे सांगून नंतर वेळोवेळी त्याना त्याचे जवळची व शाही एजन्सी आयुर्वेदीक मेडीकल सातारा येथून १७६५००/- रुपयाचे औषधे येथून दिली व नंतर ता.१४/८/२०२३ रोजी परत तळबीड येथे येवून त्या दांपत्याची मेडीकल मधील किटने टेस्ट करून सदर महिला गरोदर असल्याचे सांगितले व त्यानी सदरची टेस्ट कोणत्याही डॉक्टर कडून करु घेवून नये नाहीतर ती टेस्ट निगेटीव्ह येईल असे सांगितले व पुन्हा त्याना २६००००/- रुपयाची औषधे घ्या असे सांगितले तेव्हा सदर दापत्यास त्याचा संशय आल्याने ते सांगत असले औषधासाठी त्याचेकडे पैसे नाहीत. पैसे जमले की सांगतो असे सांगून त्याना पाठवून दिले नंतर ती टोळी त्याना आपण घेणे करीता वारंवार फोन करीत होती म्हणून त्यानी कराड येथील डॉक्टर यांचेकडे नियमीत टेस्ट केली जेव्हा त्याना महिला ही गरोदर नसल्याचे समजले नंतर त्या महिलेने सोनाग्राफी केली असता ती गरोदर नसल्याचे समजल्याने त्याची फसवणूक संबधीत लोकांनी केल्याचे लक्षात आले.

नंतर सदर लोकाचे विरुध्द ता. १६/८/२०२३ रोजी तळबीड पोलीस ठाणेत तक्रारी त्याच दिवशी सदर टोळीचे लोक पुन्हा तळबीड येथे आले असल्याचे पोलीसाना दांपत्याने दिली तेव्हा सहा. पोलीस निरीक्षक वरोटे, पो. हवा ओंबासे, ४८३. पो. ना. भोसले ब.नं १९८३. पो. कॉ. मोरे बनं २६७९ सदर टोळीतील लोकांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता जो इसम नारायण वाघ वैद्य म्हणून सांगत होता त्याचे खरे नांव राहुल धरमगिरी गोसावी वय ३२ व्यवसाय व्यापार रा तिरंगानगर साक्री ता. साक्री जि.धुळे व त्याचे बरोबर असणारे साथीदार याची नावे

१) अश्विन अशोक गोसावी वय ३४ व्यवसाय नोकरी रा गोसावीवस्ती वैद्यवाडी (हडपसर पुणे १३) मुळ गाव वाकोत ता. जामनेर जि.जळगाव

२) शैलेश सुरेश गोसावी वय २२ व्यवसाय नोकरी रा तिरंगानगर साक्री ता. साक्री जि.धुळे

३) देवेद्र ज्ञानेश्वर पवार यय ३२ व्यवसाय ड्रायव्हर रा. सुशिलानगर साक्री ता. साक्री जि.धुळे अशी असल्याचे पोलीसाना सांगितले असून त्यानी सातारा जिल्हयात बऱ्याच लोकाना अशा प्रकारे संपर्क साधुन त्याचे कडून ही अशाच प्रकारे पैसे घेवून फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे.

तरी सदर लोकांना तळबीड पोलीस ठाणेत दाखल असणारे गुन्हयात अटक करणेत आलेली असून सदर गुन्हयाचा तपास आर. आर. बरोटे सहा. पोलीस निरीक्षक तळबीड हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेख मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री बापू बांगर मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे तळबीड पोलीस ठाणेचे पोहेकॉ आप्पा ओंबासे, पोना/ योगेश भोसले, पोकों/ निलेश विभुते, पोकों/प्रविण गायकवाड, पोकों/अभ्य मोरे पो. कॉ. प्रविण फडतरे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *