मित्राच्याच पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्यावर वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

नागपूर : दिनांक 15 नोव्हेंबर 2021रोजी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सुरेश जयस्वाल वय २८ वर्षे रहाणार राजेंद्रनगर, नंदनवन झोपडपट्टी याचे पीडित वय ३० वर्षीय महिला प्रीया (बदललेले नाव) हिच्या पतीशी अभय जयस्वालची मैत्री होती. त्यामुळे तो गेल्या २०१९ पासून मित्राच्या घरी येत -जात होता. प्रियाला 5 वर्षांचा मुलगा आहे, तर अभय अविवाहित आहे.

तसेच अभय आणि प्रिया एकाच इंशुरन्स कंपनीत नोकरीला आहेत. त्यामुळे त्यांचे घरी येणे-जाणे होते. अभयची वाईट नजर प्रियावर पडली आणि तो मित्राला भेटायला येण्याच्या बहाण्याने वारंवार घरी यायला लागला. मित्राचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळेच त्याच्या वागण्यावर संशय आला नाही. याचदरम्यान प्रिया आणि पतीचा घरगुती कारणावरून वाद झाल्यास अभय हा तिला आधार देत होता आणि मित्राचीही समज घालत होता. यादरम्यान त्याने प्रियासी जवळीक साधली आणि मित्र घरी नसताना तो तिच्या घरी यायला लागला.


तसेच तिला ऑफिसमध्ये सोडणे किंवा तेथून घरी आणून सोडणे असे प्रकार वारंवार होऊ लागले त्यामुळे प्रिया आणि अभयची मैत्री झाली.पतीशी वाद वाढत गेल्यामुळे तिला अभयने आधार दिला. त्यामुळे अभयवर तिचा विश्वास बसला. प्रियाच्या याच विश्वासाचा अभयने गैरफायदा घेतला.


सन २०१९ मध्ये घरी कुणी नसताना प्रियाला त्याने प्रेमाची कबुली दिली आणि शारीरिक सुखाची मागणी केली. त्यावेळी प्रियाने आपण विवाहित असून 5 वर्षाचा मुलगा असल्याचे सांगितले.त्यानंतरही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

पहिल्यावेळी झालेल्या चुकीचा अभय प्रियावर दबाव टाकायला लागला. तिला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करायला लागला. वस्तीत दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा पसरल्यामुळे प्रियाने वैवाहिक जिवनाचा विचार करीत त्याला नकार दिला. त्यामुळे अभयने तिला पतीला सोडल्यानंतर लग्न करू अशे वचन दिले त्यामुळे त्याच्या आमिषाला ती बळी पडली. गेल्या 3 वर्षांपासून तो तिचे लैंगिक शोषण करीत असून लग्नाचा विषय निघाल्यास टाळाटाळ करीत होता.

अभयने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. प्रियाने त्याला लग्न कर असे म्हटले असता तो टाळाटाळ करु लागला.

१५ नोव्हेंबर 2021 रोजी प्रियाने अभय आपल्या घरी बोलावून लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि ‘मी फक्त टाईमपास करीत होतो’ असे सांगितले . म्हणून प्रियाच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अभय जयस्वालवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

  

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट