आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि श्री ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर ;या शिबिरामध्ये जिल्हा पालघर मधील हजारो आदिवासी बांधवांनी आरोग्य शिबिराच्या लाभ घेतला, या शिबिरामध्ये शुगर बीपी इसीजी मोफत चष्मे मोफत औषधी तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला देण्यात आला, विशेष म्हणजे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील आणि त्यांची टीम स्थानिक गावकऱ्यांनी वाजंत्री लावून व आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन ची सर्व टीम ची आरती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच 1560 नागरिकांची तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिर झाल्यानंतर खालील दिलेले ऑपरेशन सर्व मोफत मध्ये करण्यात आले,
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन मार्फत
रेशन धारकांसाठी खालील उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले , आयुष्मान भारत योजना व चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत मध्ये करण्यात आले .

१ .हृदयाच्या शस्त्रक्रिया
२ .अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया
३.हाडांचे फ्रॅक्चर
४.मणक्याच्या शस्त्रक्रिया
५ यकृताच्या शस्त्रक्रिया /उपचार
६. सांध्याच्या शस्त्रक्रिया
७.लहान मुलांच्या मोतीबिंदू व तिरळे पनाच्या शस्त्रक्रिया(स्क्विन्ट )
८.डोळ्याच्या बुबुळांवरील सफेद जाळीची शस्त्रक्रिया (टेरिजियम )
९.मुतखडा
१०. पौरुष ग्रंथीची वाढ (प्रोस्ट्रेट) शस्त्रक्रिया
११.मूत्रमार्ग च्या संबंधित शस्त्रक्रिया
१२.पित्ताशयातील खडे किंवा पित्ताशयासंबंधित शस्त्रक्रिया
१३.कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया
१४.कॅन्सर च्या शस्त्रक्रिया
१५.श्वसन नलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया
१६.किडनी संबंधित उपचार व शस्त्रक्रिया
१७. कान, नाक , घसा, संबंधित शस्त्रक्रिया
१८.जिभेच्या संबंधित शस्त्रक्रिया
१९. डायबेटिज मुळे अति प्रमाणात झालेल्या जखमांवर शस्त्रक्रिया /उपचार
२०. जुन्या हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या वर मोठ्या इम्प्लांट काढण्याच्या शस्त्रक्रिया
(स्क्रू प्लेट एकत्र असलेले इम्प्लांट )
२१ .छाती मध्ये असणाऱ्या गाठीच्या शस्त्रक्रिया
२२ .गर्भ पिशवी दुरुस्ती किंवा गर्भाशय संबंधित शस्त्रक्रिया
२३.हर्निया
२४.अँपेंडिक्स
२५ हायड्रोसिल
२६ मूळव्याध
२७ भगंदर
२८ शरीरावर असणाऱ्या गाठींच्या शस्त्रक्रिया
२९.गुढघे प्रत्यारोपण
३० .खुबा प्रत्यारोपण
३१.डिलिव्हरी (नॉर्मल किंवा सिजर ) .
संपर्क : अध्यक्ष, श्री जितेंद्र पाटील : 9970219877 / 8169741997 / 8080878096

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट