“गोंदिया जिल्हा पोलीस दल ” “कम्युनिटी पोलीसींग ” आणि ” दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गतसशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे निशुल्क चष्मे वाटप शिबीर तसेच कृषी मार्गदर्शन शिबीर संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री.निखील पिंगळे, यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी मा. श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी मा.श्री. विवेक पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल अतिदुर्गम क्षेत्रातील जनतेच्या हिताकरिता कम्युनिटी पोलीसींग आणि दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत कार्य क्रमाचे आयोजन करून विविध कल्याणकारी उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव व भा.रा.ब.०२ बिरसी गोंदिया यांचे वतीने बृहन्मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॅच २००४ (PTS सोलापुर) यांच्या सहकार्याने सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव च्या कार्यक्षेत्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी गरजू जनतेकरीता कम्युनिटी पोलीसींग व दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातुन मौजा- गंधारी व गोठणगाव येथे नागरीकांकरीता नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले होते. सदर शिबीरामधील एकूण १६० नागरीकांना नंबरचे चष्मे लागत असल्याचे निष्पन्न झाले होते. दि. २३/०७/२०२४ रोजी सशस्त्र गोठणगाव यांचेकडून एकूण १६० नागरीकांना उच्च दर्जाच्या चष्म्यांचे निशुल्क वाटप करण्यात आले….. तसेच नक्षल दमन विरोधी सप्ताहानिमीत्त सशस्त्र गोठणगाव परिसरामधील नागरीकांना श्री. राजेश संग्रामे सा. कृषी पर्यवेक्षक, श्री. पंकज सुर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक, ता. मोरगाव अर्जुनी यांनी कृषी विषयक मार्गदर्शन केले…
सदर कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे आदिवासी गरिब गरजू नागरीकांना बृहन्मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॅच- २००४ (PTS सोलापुर) यांनी त्यांचे २० व्या वर्षपूर्ती निमीत्त चष्मे दिलेले असून सदर बॅचमधील सपोनि नवनाथ उघडे, श्री. राजेश अहिरे, श्री. अमित चोपडे, श्री अमोल घोडके, श्री. प्रशांत साळुंखे, आबासाहेब साळुंखे यांनी सदर कामासाठी पुढाकार घेतला…
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, श्री. गणेश वनारे ठाणेदार केशोरी,उपसरपंच कांतीलाल डोंगरवार प्रामुख्याने हजर होते… तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी स.दु. गोठणगांवचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन घाटे, पोउपनि प्रशांत नारखेडे, पोहवा. सतीश भोवते, गणेश मिसार, शामराव मढावी, देवेन्द्र थेर तसेच IRB चे पोहवा संदिप नागापूरे, सुभाष राउत यांनी परिश्रम घेतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com