सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव तर्फे निशुल्क नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उप-विभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग देवरी, श्री. विवेक पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलीसींग / दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात…

या अनुषंगाने दिनांक- १८/०२ /२०२४ रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव, भा. रा. ब. ०२ बिरसी गोंदिया व के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बृहन्मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॅच २००४ ( ITS सोलापुर ) यांच्या सहकार्याने सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव कार्यक्षेत्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेकरीता कम्यूनिटी पोलीसींग व दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मौजा गंधारी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत परशुरामकर व स्वप्नील गायकवाड यांच्या पथकाकडून निशुल्क नेत्र तपासणी व विविध प्रकारच्या आरोग्या विषयी तपासणी करण्यात आली…. सदर शिबीरामध्ये गोठणगांव परीसरातील अंदाजे २०० नागरीकांची नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. ४५ नागरीक मोतीबिंदु ग्रस्त तसेच ५० नागरीकांना चष्मा असल्याचे निष्पन्न झाले . ..* सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव तर्फे अश्या नागरीकांना चष्मे वाटप करण्यात येणार असून विविध संस्थांच्या मार्फतीने मोतीबिंदुग्रस्त नागरीकांवर उपचार करण्यात येणार आहे…..

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स. दु. गोठणगांवचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन घाटे, पो.उप.नि. शुभम नवले जि.प.शाळा गंधारीचे शिक्षक सुरज डाखोळे, पोहवा सतीश भोवते, राजेश पुराम, गणेश मिसार, पोलीस नाईक अरविंद वालदे, कमलेश राऊत पो.शि. रत्नशिल मेश्राम, प्रकाश गभणे , नोहरलाल लिल्हारे तसेच IRB चे पोहवा . राजु सोलंकी, पो.शि. कमलेश डोंगरवार व पो.शि. शुन्यकुमार हजारे यांनी परिश्रम घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट