रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे घाणेघर
या आदिवासी पाड्यात महिलांसाठी विविध वस्तूंचे मोफत वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

विक्रमगड: आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे देणं लागतो हेच देणं फेडण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या महामुंबई विभागाच्या वतीने घाणेघर तालुका, विक्रमगड जिल्हा पालघर येथील आदिवासी पाड्यामध्ये महिलांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन माणूसकीचे अंगण (साड्यांचे वाटप)

सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप
शिक्षणाचे महत्त्व व रोजगार निर्मिती बाबतचे मार्गदर्शन शिबिर तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे गणवेषाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून स्पॉन्सर्सच्या स्वरूपात आणि प्रतिष्ठान च्या अधिकृत सदस्य व पदाधिकारी यांचे कडून आर्थिक योगदान प्राप्त झाले.

यावेळेस रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष माननीय निलेश बाबा जगदाळे, ज्येष्ठ समाजसेविका व सदस्या मा. कविताताई पाटणकर धगधगती मुंबईचे संपादक माननीय भीमरावजी धुळप, पुरंदर विभाग संघटक मा. भरत दादा खेनट सौ. दिपालीताई खेनट व महामुंबईचे समस्त सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी प्रतिष्ठानच्या समस्त सदस्य व पदाधिकाऱ्यांचे घाणेघर आदिवासी पाड्यातील सर्व ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी वर्गाने आदिवासी पारंपारिक तारपा या संगीत वाद्याच्या तालावर पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करत सहर्ष स्वागत केले..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट