कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क व्यवसायिकांच्या एकदिवसीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .!!! समाज बांधवांची लाखोंची खरेदी विक्री .

प्रतिनिधी :-सचिन पवार
दादर:– कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थे मार्फत रविवार दिनांक ०९ जुलै , २०२३ रोजी गावस्कर हॉल , मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग , दादर ( पूर्व ) येथे निःशुल्क एकदिवसीय व्यवसायिकांच्या मालाचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रदर्शन व विक्री महोत्सवात मुंबई , ठाणे , कोकण , पुणे येथील संस्थेच्या सभासद असणाऱ्या व्यवसायिकांनी आपल्या उत्पादनाचे स्टॉल लावण्यास उत्स्फूर्त सहभाग घेतला होता . जागा अपुरी पडल्याने अनेक व्यवसायिकांना या महोत्सवात सहभागी होता आले नाही या बाबत संस्थेने दिलगीरी व्यक्त केली . संस्थेने अत्यंत कमी वेळेत या महोत्सवाचे नियोजन करूनही समाजातील बंधु आणि भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला . खास करून महिला वर्गाने या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता . संस्थेच्या एकमेका साहाय्य करू ! अवघे होवू श्रीमंत या ब्रीदवाक्या प्रमाणे प्रत्येक व्यवसायिकांने आपल्या उत्पादनाच्या विक्री बरोबरच इतर व्यवसायिक बंधु भगिनींच्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊन भविष्यात एकमेकाच्या सहकार्याने व्यवसायात वृद्धीसाठी सहकार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले .
त्याच बरोबर अनेक व्यवसायिकांनी नव – व्यवसायिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य संस्थेच्या मार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे . या महोत्सवामुळे कुणबी समाजातील बंधु भगिनी , नव – व्यवसायिकांना या क्षेत्रात येण्याची खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध झालेली आहे . संस्थे मार्फत प्रथमच आयोजित केलेल्या या व्यवसायिक साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवास समाज बांधवांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थेने समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले . तसेच या सारखे महोत्सव अनेक ठिकाणी राबविण्याचे आश्वासन समाजातील व्यवसायिकांना संस्थेने दिलेले आहे . संस्थेने प्रथमच आयोजित केलेल्या या महोत्सवात एक दिवसाच्या खरेदी विक्री मध्ये जवळ जवळ ८ ते १० लाखाची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली . संस्थेच्या या प्रयत्नांना यश येत असून लवकरच या व्यवसायिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करेल अशी आशा सर्व व्यवसायिकांनी व्यक्त केलेली आहे . प्रत्येक व्यवसायिकांचा अभिप्राय घेण्यासाठी संस्थेचे सन्माननीय संस्थापक श्री . अशोकदादा वालम साहेब , अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे , उपाध्यक्ष व नियोजक श्री . प्रकाश भोस्तेकर आणि सर्व कार्यकारिणीने प्रत्येक स्टॉलला भेट देवून त्यांचा अभिप्राय जाणून घेतला .

या महोत्सवाला संस्थेचे संस्थापक सन्माननिय श्री . अशोकदादा वालम साहेब , कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री . भूषणजी बरे साहेब , कुणबी युवाचे अध्यक्ष सन्माननीय श्री . माधवजी कांबळे साहेब , कुणबी समाजोन्नती संघ गुहागरचे अध्यक्ष सन्माननीय श्री . कृष्णाजी वने साहेब , कुणबी समाजाचे युवा नेतृत्व उत्कृष्ट सूत्रसंचालक , नाटककार , दिग्दर्शक श्री . सुनीलजी माळी साहेब हे आवर्जून उपस्थित होते . या महोत्सवाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रुचिता बोलाडे यांनी आपल्या वकृत्व कौशल्याने समर्थपणे पार पाडली . तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष व नियोजक श्री . प्रकाश भोस्तेकर यांनी समर्थपणे पार पाडली . या साठी संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे , सचिव ऍड .श्री . अजय पाटील , सहसचिव ॲड . श्री . विनेश वालम , खजिनदार श्रीमती . हर्षालीताई धाडवे, उपाध्यक्ष श्री . दयानंद चिंचवलकर , सहसचिव श्री . महेश पारदुले, सहखजिनदार ॲड . श्री . अवधूत तोरसकर , सदस्य श्री . पंकज पालकर , श्री . श्रीधर कदम व श्री . रघुनाथ कळभाटे यांनी सर्वांनीच मोलाचे योगदान दिले . या महोत्सवासाठी करण्यात आलेल्या जाहिराती , हॉलची उत्कृष्ट मांडणी , स्टेज वरील बॅनर , से पॉइंट बॅनर याचे संपूर्ण नियोजन श्री . श्रीधर कदम यांनी कौशल्याने केले . तसेच श्री . पंकज पालकर , श्री . प्रकाश भोस्तेकर यांनी त्यांना प्रत्येक कामात मोलाचे सहकारी केले .


सदरच्या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी बळीराजा सेना , आदित्य इंटरप्राईजेस , भैरवी कॉन्सेप्ट , वनसोअर्स सर्व्हिस , प्रकाश शिर्के आर्किटेक्चर , गौरव इन्टरप्राईज , प्रभात ऑटोमेशन , स्पिंक डिझाईन , ए एस एम होस्पिबिलिटी , बायो मायलेजर , पिरॅमिड कन्सल्टंट , एच के बलुन्स आणि स्वावलंबी इंटरपिजेस या सर्वांची संस्थेला आर्थिक योगदान दिले . या महोत्सवात सहभागी झालेल्या व्यवसायिकांचे आणि आर्थिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तींचे अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे , उपाध्यक्ष श्री . प्रकाश भोस्तेकर आणि सर्व कार्यकारिणीच्या हस्ते सन्मानचिन्ह , शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुयोग्य सन्मान करण्यात आला . शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे यांनी सर्व व्यवसायिक , समाजबांधव यांचे मनःपूर्वक आभार मानून महोत्सवाची सांगता केली .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com