फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर यानी रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून ५,८७,३००/-रू. कि.चे २९ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम.डी.) केले जप्त..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :

मा. पोलीस उप आयुक्त परि. १ श्री. संदिपसिंह गिल यांनी हद्दीतील सर्व तपास पथकांना सुचना देवुन अंमली पदार्थ विक्री करणा-याची गुप्त माहीती काढून कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे दि.२५/०३/२०२५ रोजी श्रध्दा सोप कंपनीच्या समोर, नाडे गल्ली, गणेश पेठ पुणे येथील सार्वजनिक रोडवर अझहर ऊर्फ बड़े सय्यद वय ३१ वर्षे रा. नाडे गल्ली, गणेश पेठ, पुणे हा सदर भागात मॅफेड्रॉन (एमडी) ची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार महेश राठोड व समीर माळवतकर वांना त्याचे बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सदर ठिकाणी जावून सापळा रचुन कार्यवाही केली असता आरोपी अझहर ऊर्फ बड़े सय्यद रा.नाडे गल्ली, गणेश पेठ यांचे ताब्यात ५,८७,३००/-रू. कि.चे २९ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम.डी.) मुद्दे मालजप्त करण्यात आले असून पोलीस अंमलदार महेश राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पोलीस स्टेशनला गुर नं. ५८/२०२५ कलम एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीने हे एम.डी. कोतून विकत घेतले त्याबाबत तपास सरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाचव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे श्रीमती अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, सहा. पोलीस निरी. वैभव गायकवाड, पोलीस उप निरी अरविंद शिंदे सहा. पो. फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागरे, गजानन सोनुने, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट