चारचाकी वाहन चोरी करणारा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 2 लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत जप्त..!!

प्रतिनिधी-रणजित मस्के
नंदुरबार: दिनांक 13/12/2022 रोजी सांय 05/00 ते दिनांक 14/12/2022 रोजी रात्री 80/00 वा. दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजुला श्री. पंडीत गंगाराम चौधरी यांचे 2,00,000/- रु कि पिकअप वाहन MH 39 C 5583 हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले, म्हणुन श्री. पंडीत गंगाराम चौधरी रा- मेहरबान रोड खेतीया ता- पानसेमल जि – बडवानी यांचे फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द् गु.र.नं. 393/ 2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दिनांक 15/12/2022 रोजी 15/ 58 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला मिळून आल्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी ते वाहन चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे आणून उभे केलेले होते. सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनाबाबत खात्री करुन ताब्यात घेतले होते, परंतु आरोपी चोरी करणारे आरोपी मात्र अद्याप मिळून आलेले नव्हते.
दिनांक 23/12/2022 रोजी अमावस्या असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दिनांक 22/12/2022 चे 23.00 ते दिनांक 23/12/2022 चे 05.00 वा. दरम्यान असल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आलेली होती व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे जिल्ह्यातील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते.
त्यादरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातून चोरी झालेली पिकअप ही बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश येथील सुनिल पावरा, पिंटु ओंकार भिल यांनी मिळून केलेली असून सुनिल पावरा हा सद्या खेडदिगर गावात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळविल्यानंतर त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी नामे सुनिल पावरा याचा खेडदिगर गावात व परिसरात शोध घेतला असता सुनिल पावरा हा खेडदिगर गावात मारुती मंदीराजवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता सुनिल सुरेश पावरा वय- 23 रा. बाजार पेठ मार्ग, बोरकुंड ता. जि. धुळे ह. मु. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेला संशयीत इसम नामे सुनिल पावरा यास खेडदिगर गावातून चोरी केलेली पिकअप वाहनाबाबत विचारपूस केली असता तो सुरुवातीस उडवा- उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी त्याचा नातेवाईक नामे पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचे मदतीने खेडदिगर येथून रात्रीच्यावेळी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले पिकअप वाहन हे धुळे येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून गेलो होतो, परंतु सदरचे वाहन विक्री न झाल्याने ते धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला उभे करुन तेथून तो व त्याचा साथीदार नामे पिंटु भिल तेथून पळुन गेलो बाबत सविस्तर हकिगत सांगितली. त्याअनुषंगाने पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचा बेहडीया व आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी व गुन्ह्यातील 2,00,000/- रु. किं.चे एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन क्रमांक MH 39 C 5583 असे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यातील फरार आरोपी नामे पिंटू ओंकार भिल याला देखील लवकरच अटक करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com