चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणारा अटक गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांची कामगीरी…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

मिरारोड:

     फिर्यादी नामे विनोद सुभाष पवार वय ३७ वर्षे, व्यवसाय, नोकरी रा. बी / ७ / २०४, युनिक क्लस्टर, शांती पार्क, मिरारोड पूर्व, यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात खबर दिली कि, यातील आरोपीत नामे विशाल चाळके, वय - ४० वर्षे, रा. रुम नं. ६०५ / डीआर/ ०४ म्हाडा कॉलनी, मोबाईल नेस्ट शॉप जवळ, राम मंदिर, गोरेगांव पश्चिम, मुंबई यांनी एक इर्टीका कार क्रमांक एम. एच. / ४६ / बीव्ही / १४१७ ही दाखवुन सदर गाडी विक्री करण्याचे सांगुन, फिर्यादी यांचेकडुन रोख रक्कम चार लाख रुपये घेवुन कोऱ्या कागदावर गाड़ी विक्री केली असल्याचे लिहून देवुन गाडी विक्री केलेली होती.

त्यानंतर सदर गाडी ही मुळ मालक भगवानराव शांताराम तकारखेडे यांनी फिर्यादी यांना विक्री केलेली गाडी फिर्यादी यांचेकडुन घेवुन गेले होते. फिर्यादी यांनी आरोपीत विशाल चाळके यांना सदर बाबत सांगीतले असता त्यांनी भगवानराव तकारखेडे यांचेशी झालेला व्यवहार माझा असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे पैसे परत देतो असे सांगुन पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणुक केलेली आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन मिरारोड पो.ठाणे येथे गुरनं. ०२८३ / २०२३ भादंविसं. कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

        सदर गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे शाखा १ करीत असतांना बातमीदार यांचे कडुन सपोनिरी प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्हयांतील आरोपीत यांचा शोध घेत असतांना आरोपीत नामे विशाल विलास चाळके वय ३८ वर्षे, व्यवसाय-गाडया खरेदी विक्री, रा. भोरी चाळ रुम नं. ४३७, बिल्डींग नंबर १३ च्या बाजुला, म्हाडा कॉलनी, राम मंदिर, सोमानी राम, गोरेगांव पश्चिम, मुंबई, हा धानीव बाग वसई पूर्व येथे असल्याची मिळालेल्या माहीतीवरुन त्यास दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल चाळके यास सखोल विचारपुस करता त्याने आपण सदर गुन्हयांतील गाडी क्रमांक एमएच / ४६ / बीव्ही / १४१७ ही मुळ मालक भगवानराव तकारखेडे यांचेकडुन ५०,००० रुपये महिना भाडयाने घेवुन ती यातील फिर्यादी यांना चार लाख रुपयांना परस्पर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

           आरोपीत विशाल चाळके यांचे कडे सखोल विचारपुस करता त्याने अशाच प्रकारे पुणे औरंगाबाद, नांदेड, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी लोकांना फसवुन ०८ गाडया विक्री केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीत याने मुळ मालक यांची फसवणुक करुन परस्पर विक्री केलेल्या खालील प्रमाणे गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. 

०१ ७,००,०००/- एक सिल्हर रंगाची मारुती वॅगनॉर कार R Lxi CNG क्रमांक MH-04-LB-2360 चेसीस नंबर MA3JMTBISNB646882 इंजीन नंबर K10CNL039964

०२ ७,००,०००/- एक सफेद रंगाची मारुती वॅगनॉर कार R Green Lxi क्रमांक MH-04-JV-2780 चेसीस नंबर MA3EWDE1500E89088 इंजीन नंबर K10BN8172400 जुवा. किसु.

०३ ८,००,०००/- एक लाल रंगाची सुझुकी कार CIAZ DELTA क्रमांक MH-48-AW-0598 चेसीस नंबर MA3EXMG1SOO282944 इंजीन नंबर K14BN7161172

०४ ५,५०,०००/- एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH-03-DG-0592 चेसीस नंबर MBHCZC03SKA345061 इंजीन नंबर D13A0786389

०५ ६,००,०००/- एक सफेद रंगाची मारुती इरटींगा कार क्रमांक MH-03-BW-8696 चेसीस नंबर MA3ELMG1500350574 इंजीन नंबर K14BN7109624

०६ ९,००,०००/- एक सफेद
रंगाची मारुती इरटींगा कार क्रमांक MH-47-AS-0612 चेसीस नंबर MA3BNC52SKH182964 इंजीन नंबर E15AN1022719

           ४२,५०,००० /-          रुपये  एकुण किंमत.


                  “उघडकीस आलेले गुन्हे"

१) मिरारोड पोलीस ठाणे ०२८३/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ४२० प्रमाणे

२) दिंडोशी पोलीस ठाणे ०५३८/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ४२० प्रमाणे

३) कासारवडवली पो. ठाणे ०२६७/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे

४) विरार पो. ठाणे ७५६/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ प्रमाणे

यातील अटक आरोपीत विशाल चाळके हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलिस आयुक्तालयात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ? काशिमीरा येथील पो.नि. अविराज कुराडे, स. पो. नि. कैलास टोकले, स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे स.पो.निरी पुष्पराज सुर्वे, स.फौ.राजु तांबे, संदीप शिंदे, पो. हवा. अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधिर खोत, विकास राजपुत, पो. अं. प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी तसेच स. फौज. संतोष चव्हाण, सायबर विभाग, तसेच म.सु.ब.चे किरण आसवले यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट