महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे संस्थापक श्री. राहुल दुबाळे यांना विधान परिषदेत आमदार करण्याची मागणी..

प्रतिनिधी-रणजित मस्के
माजलगाव: शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी बीड जिल्ह्यातील, माजलगाव तालुक्यातील, माजलगाव ग्रामीण येथे पोलीसांच्या हक्कासाठी सदैव लढणारे,पोलिसांच्या तसेच त्यांच्या परिवारासाठी प्रसंगी धावून जाणारे महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे संथापक अध्यक्ष मा . श्री. राहुल अर्जुनराव दुबाळे साहेब यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेण्यात यावे.

तसेच पोलीस परिवारांसाठी पोलीस परिवार महामंडळ स्थापन करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना महाराष्ट्र पोलीस बॉइज विदयार्थी आघाडीच्या वतीने देण्यात आले..!

यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com