किल्ले रायगड पायी मार्गावरील वाळसुरे खिंडीजवळ दरड कोसळली…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :-रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मागील काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त अडकले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आला होता. तर दोन दिवसांपूर्वी पर्यटकांसाठी रोपवे सुरू करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथे बंदोबस्त लावण्यात आलाय. मात्र आज खूबलढा बुरुज वाळसुरे खिंडी जवळ एक दरड कोसळली आहे. शिवभक्तांसाठी किल्ले रायगड वर पायी जाण्यासाठी बंदी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क रहावे असे आव्हान यावेळी पोलिसांनी केले आहे.

तसेच बांधकाम विभाग व पुरातत्त्व विभाग यांनी किल्ले रायगडच्या पायवाटेवर आलेला दरडीचा मलबा हटवून पायी मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट