किल्ले रायगड दर्शन करून परतीच्या प्रवासात बस दरीत कोसळुन ७ जण जखमी…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

माणगांव: किल्ले रायगड दर्शन आटपून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी मिनी बसला माणगाव तालुका हद्दीत घरोशी वाडी येथे अपघात झाला आहे. पुण्याकडे जात असताना घरोशी वाडी घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, खाजगी मिनी बस पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली.

सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने, मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, त्यांच्यावर मानगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

यामध्ये सात जण जखमी झाले आहेत .माणगाव पोलीस व साळुंखे रिस्क्यू टीम च्या मदतीने मदत कार्य सूरू करण्यात आले .पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी स्कूल मधील शिक्षक पालक आणि विद्यार्थी रायगड सहलीसाठी आले असता परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला आहे. या बस मध्ये 32 प्रवासी प्रवास करीत होते . हा अपघात कसा झाला याबाबतचा अधिक तपास मानगाव पोलीस करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट