बळजबरीने चोरी करणारे मोबाईल चोर अंबड पोलीसांच्या ताब्यात गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ठ कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
नाशिक:
मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी साो, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख सो, यांनी गुन्हे उघडकिस आणण्यासाठी अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन ने खालील गुन्हे उघडकीस आणले आहे.
अंबड पोलीस ठाणेकडील गुरनं ४४२ / २०२३ भादविक ३९२, ३४ प्रमाणे दिनांक १७/०७/२०२३ रोजी २२:५० वा फिर्यादी नामे राहुल अरविंद बेडसे वय-२६ धंदा नोकरी, मुळ रा मु पो म्हसदी, ता साकी, जि धुळे सध्या रा- ओंकार ट्रॅव्हल एजन्सी जवळ, काकडे मळा, अशोकनगर, सातपुर नाशिक हे दिनांक १५/०७/२०२३ रोजी रात्री ०८:०० वा चे सुमारास उषा हॉस्पीटल समोर, सिडको, नाशिक येथुन माझे मोबाईल फोन वर बोलत रस्त्याने पायी जात असतांना माझे समोरून एका राखाडी रंगाचे मोटार सायकलवर दोन इसम आले त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे हातातील मोबाईल फोन बळजबरीने चोरी करून मोटार सायकलचवर पळुन गेले म्हणुन त्यांचे तकारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहिती काढुन १ ) प्रथमेश रविंद्र अवसरकर वय २२ रा अवसरकर वाडा, विठठ्लकर मंदिराजवळ, पळशीकर वाड्याशेजारी, काजीपुरा, जुने नाशिक २) निखिल अजय बांडे वय २२ वर्ष, रा. फ्लॅट नं. १९, सेवालाल सोसायटी, जनकल्याण बॅकेचे मागे, श्रीहरी कुटे मार्ग, तिडके कॉलनी, नाशिक यांना सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ११,०००/- रू कि ची एक मोबाईल फोन तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले ५५०००/- रू किंमतीचे ०४ फोन व एक ३५०००/- रू कि ची एक राखाडी रंगाची मोटार सायकल हस्तगत करून एकुण १,०१,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी, परिमंडळ – ०२, सहा पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ क्राईम पोनि अजय नजन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख व पोउनि संदिप पवार व अंमलदार पोहवा ४१३ पानसरे, पोना १८४८ गायकवाड, पोना २०९८ परदेशी, पोशि २०५४ करंजे, पोशि २०८३ ढाकणे, पोशि २३५९ शिंदे, पोशि २३९१ भुरे, पोशि २५४७ शिंदे, पोशि २२२९ भोये, पोशि २६९७ राठोड, पोशि ९३० राउत, पोशि २३४६ मते, पोशि १५६६ जाधव, पोशि २०९३ पाटील यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि नाईद शेख व पोशि २०९३ पाटील हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com