जबरीने मारहाण करुन खंडणी घेणा-या खंडणीखोरास त्वरीत अटक..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

कराड शहर पोलीस टिमची प्रशंसनीय कामगिरी.कराड शहर पोलीस ठाणे हददीतील खंडणीखोर, दहशत माजविणा-या खंडणीखोरांवर कडक कारवाई करणे बाबत मा. समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी तसेच कराड शहर पोलीसांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे प्रदिप सुर्यवंशी यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच इतर सर्व सह अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.

फळविक्री व्यवसाय करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या श्री. विलास राव जावळे हे त्यांचे दोन्ही मुलांसह मंडई परीसरात केळी विक्री करीत असताना दिनांक 10.08.2023 रोजी सायंकाळी ६ वा. चे सुमारांस पवन देवकुळे रा. बुधवारपेठ कराड याने केळाच्या गाडीवर येवून मी कराडचा भाई आहे, मला माझा हप्ता म्हणुन हजार रुपये दे असे म्हणून पैसे देत नसलेने त्यांना मोठमोठयाने शिवीगाळ, दमदाटी करून मंडई सारख्या गजबजलेल्या परीसरात दहशत निर्माण करून हातातील कोयत्याची दहशत करुन विलास जावळे यांचे कडील एक हजार रुपये जबरीने काढुन घेवुन कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करणेचा प्रयत्न करुन निघुन गेला होता. विलास जावळे यांचे फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणेत आला होता. घटनेची माहीती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक, संदिप मोरे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्वरीत कार्यवाही करीत त्यांस ताब्यात घेवुन अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संदिप मोरे हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागर सो. सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदिप मोरे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

अशा प्रकारे कोणी भाईगिरीच्या भाषा वापरुन खंडणी मागत असेल तर त्वरीत कराड शहर पोलीस स्टेशनला कळवावे. कळविणाराचे नांव गोपनीय ठेवुन माहीतीची सत्या असत्यता पडताळून अशा खंडणीखोरांविरुध्द कडक कारवाई करणेत येणार असलेचे कराड शहर पोलीसांतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप सुर्यवंशी यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट