शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त घाटकोपर येथे गरजू महिलांना साडी वाटप…

प्रतिनिधी-रणजित मस्के
घाटकोपर: घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथे आयोजक श्री. अविनाश रघुनाथ कदम यांच्या तर्फे दिनांक 29 सप्टेंबर 2022 गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. महिला या जन्मतः सक्षम आहेतच,पण त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजात सुरक्षित वातावरण आणि समान संधी देणं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.








महिलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करूया आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजातील एक घटक म्हणून प्रामाणिकपणे हॆ कार्य पार पाडुया म्हणून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घाटकोपर विभागामधील गरजू महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co