रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी माणगांव रेल्वे स्थानकात दिवसभर ठाण मांडून बसलेले संवेदनशील, कर्तव्यदक्ष, धडाकेबाज माणगांव तहसिलदार विकासजी गारुडकर नागरिकांनी अनुभवले…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव रायगड

रायगड :-काल कोकण रेल्वे मार्गावर पनवेल नजीक मालगाडी रुळावरून सरकल्यामुळे अपघात झाला. परिणामी आज सकाळी कर्नाटक, गोवा, तळकोकणातून आलेल्या रेल्वे गाड्या वीर, माणगांव, इंदापूर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून थांबवण्यात आल्या. सकाळी 7 च्या सुमारास सदर स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबल्यामुळे त्यातील प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळपासून दुपारी 1.00 वाजेपर्यंत प्रवाशांची कोणतीच पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे माणगांव रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी संतप्त झाले. काही अनुचित प्रकार घडण्याअगोदरच माणगांव तहसीलदार श्री. विकासजी गारुडकर व महसूल अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी श्री. डोईफोडे व सहकारी यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सन्मा. तहसिलदार विकासजी गारुडकर यांनी पुढाकार घेऊन माणगांव बस आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांच्याशी संपर्क साधत तातडीने 6 बस गाड्यांची व्यवस्था केली.प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेसाठी माणगांव-पनवेल साठी व्यवस्था केलेल्या सदर बसेसचा जवळपास 1,10,000/- रु. या खर्चाची जबाबदारी विकासजी गारुडकर मा. तहसिलदार, माणगांव यांनी आपल्या खांद्यावर घेतली. प्रवाशांना पाणी, नाश्ता सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिले.

रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा सामान्य प्रवाशांच्या मदतीसाठी माणगांव रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांच्या केबीन ला दिवसभर ठाण मांडून बसलेले संवेदनशील, कर्तव्यदक्ष माणगांव तहसिलदार नागरिकांनी पहिल्यांदा अनुभवले.

ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब संवेदनशील मनाने राज्यातील जनसामान्यांच्या मदतीला धावून जातात, अगदी तशाच प्रकारे त्यांच्या सरकारमधील प्रशासकीय अधिकारी सुद्धा लोकांच्या मदतीला धावून जातात हे चित्र मा. तहसिलदार, माणगांव यांच्या आजच्या कृतीने सर्वांनाच अनुभवायला मिळाले.सदर प्रसंगी शिवसेना-युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष-निलेश थोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी घाग, पोलीस अधिकारी श्री. डोईफोडे, आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांनी प्रशासनाला चांगले सहकार्य करत प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट