महाडमध्ये पहिल्यांदाच मालमत्ता हस्तांतर सोहळा कार्यक्रम संपन्न चोरीच्या मोटर सायकल दिल्या मालकांच्या ताब्यात..
उपसंपादक : राकेश देशमुख
महाड :-महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.अशातच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे कडून मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. एमआयडीसी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह आरोपींना पकडण्यात API मारुती आंधळे यांच्या टीमला यश मिळाले आहे. चोरीला गेलेले वाहन हे फिर्यादी व वाहन मालकांना परत कसे मिळवायचे याचा एक पेच निर्माण झाला होता .
रायगड जिल्ह्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांनी या कामगीरीने नागरिकांचा अधिक दृढ विश्वास वाढला ,याचा प्रत्यय सर्वत्र प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. महाड पोलीस कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मालमत्ता हस्तांतर कार्यक्रमाच्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे,उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे , तहसीलदार महेश शितोळे तसेच पद्मश्री भूषण डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक श्री मायने, पोलीस निरीक्षक श्री तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने या सर्वांच्या साक्षीने फिर्यादी व वाहन धारकांना त्यांचे चोरीला गेलेल्या मोटर सायकल सुपूर्त करण्यात आल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com