शालेय विद्यार्थ्यांना भौगोलिक माहिती मिळावी त्याचबरोबर पर्यटन व्हावे या हेतूने अध्ययन संस्था मुंबई आणि सुगंधा फार्म कुझें यांच्या संयुक्त साहाय्याने भूगोल उद्यान सुरू..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

कासा ;-(२२ एप्रिल) रोजी कुझें येथे भूगोल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यातील हे चौथे भूगोल उद्यान आहे.

विक्रमगड पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुझें गावातील सुगंधा फार्ममध्ये अध्ययन संस्था आणि सुगंधा फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल उद्यानाची उभारणी करण्यात आली. त्याचा उद्घाटन सोहळा पडला.

१५०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील या भूगोल उद्यानात उठावांच्या मोठ्या नकाशांबरोबरच भूगोलातील विज्ञान आणि गणित समजावून घेण्यासाठी कृतिशील अशी भौगोलिक उपकरणे बसवली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या भूगोल उद्यानामुळे फिरण्यासोबतच ज्ञानसुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी अनेक उठावाचे नकाशे आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १६ वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत. उठावाच्या नकाशाच्या अभ्यासातून भौगोलिक रचना समजणार आहे. डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे ग्रहणे अशी
प्रकारचे मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत.

उठावाच्या नकाशाच्या अभ्यासातून भौगोलिक रचना समजणार आहे. डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे ग्रहणे अशी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना समजणार आहे.अशी माहिती अध्ययन संस्था व सुगंधा फार्म यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट