फ्लिपकार्ट कंपनीत रू 1,23,447/- ची चोरी करणाऱ्या डीलीव्हर बाँयला अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली:-
दिनांक 14/05/2023 रोजी एम एच बी कॉलनी पोलिस ठाणे हद्दीत फ्लिपकार्ट कंपनीत डीलीव्हर बाँय म्हणुन कामावर असलेला ईसम याने एकुण 15 पार्सल डीलीव्हरी करुन पार्सल बँग ऑफिसला ठेवुन त्याने डीलीव्हरी केलेल्या पार्सलचे 1,23,715/- रु. ( एक लाख तेवीस हजार सातशे पंधरा रुपये) ऑफिसला जमा न करता त्याच्या ताब्यात विश्वासाने दिलेल्या मालमत्तेची डीलीव्हरी करुन त्याच्या बदल्यात आलेल्या रोख रक्कमेचा त्याचे वैयक्तीक फायद्याकरिता वापर करुन अपहार केला व फ्लिपकार्ट कंपनीचा अन्यायाने विश्वासघात गेला आहे म्हणुन एम एच बी कॉलनी पोलिस ठाणे गु र क्र 262/23 कलम 408 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
तपास
नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ट पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी पोलिस उप निरीक्षक दिपक हिंडे यांना तपासाच्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशीत केले.
सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोऊनि दिपक हिंडे यांनी आरोपींचे मोबाईलचे सीडीआर व इतर तांत्रिक गोष्टीचे विश्लेषण करून , पोऊनि दिपक हिंडे व पोशी घोडके यांनी नमूद आरोपिताचा शोध घेऊन त्यास मीरा रोड परिसरातून स्वीगी ऑर्डर डीलीवरी करताना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक आरोपीचे नाव व पत्ता-
शैलेश सुहास दिघसकर , वय 40 वर्षे, धंदा- डिलिव्हरी बॉय , रा.ठी. शॉप नं 09, पंचवटी धाम, अशोक वन ,रावळपाडा, शिव वल्लभ रोड, दहिसर पूर्व, मुंबई .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com