जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न…

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :-दि. १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान, कोळगांव येथे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मान्यवर, जिल्ह्यातील नागरीकांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.



या समारंभास जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजिव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसादपथक, दंगल नियंत्रण पथक, पालघर पोलीस पथक, पालघर महिला पोलीस पथक, पालघर पोलीस वाहतूक शाखा पथक, पालघर अग्निशमन दल पथक, पालघर पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, पालघर पोलीस श्वान पथक, रस्ता सुरक्षा अभियान पथक, आदिंनी संचलनाव्दारे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com