फायटर क्रिकेट ॲकॅडमी संघ माणगांव यांनी नवी मुंबई चॅम्पियनवर ३१ धावानी मिळवला विजय…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-दि.4 ऑक्टोंबर 2024 रोजी खारघर घरत क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये फायटर्स क्रिकेट ॲकॅडमी माणगाव संघाचा चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी नवी मुंबई या संघावर 31 धावांनी विजय माणगाव संघानी प्रथम फलंदाजी करत 30 षटकात 205 धावा केल्या.

यावेळी 206 धावाचा पाठलाग करताना खारघर नवी मुंबई संघाचा डाव 174 धावांवर आटोपला माणगाव संघाकडून साई भिलारे यांनी 100 धावांची खेळी केली तसेच अथर्व खांडेकर यानी 41 धावांची खेळी केली.गोलंदाजी मध्ये माणगाव संघाकडून आरुष जाधव याने दोन बळी मिळवले तसेच पार्थ बामणे, अनिकेत सुकुम, सुजल दिवा आणि तेजस मोहिते यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

दोन्ही सामने जिंकून माणगाव संघाने मालिकेवर 2-0 असा विजय मिळवला, माणगांव क्रिकेट ॲकॅडमी चे संस्थापक, अध्यक्ष कोचं सुमित काळे यांच्या संघर्षामुले माणगाव संघाच्या ह्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट