वहातूक स.पोलीस आयुक्त श्री.मंदार धर्माधिकारी यांच्या हस्ते ३०,०००/-रुची बँग रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणाने परत केल्याबाबत सत्कार…

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली : रमेश गणपत रांजने हे रीक्षा चालक असून त्यांनी ११/०१/२०२३ रोजी संध्याकाळी ६.१६ वाजता एमस हाॅसिपटल येथून प्रवासी बसला असून डोंबिवली स्टेशन बाजी प्रभू चौक येथे उतरला.प्रवासी निघून गेल्यावर रीक्षा चालकाच्या लक्षात आले कि प्रवासी रीक्षात बँग विसरला आहे.ही बाब लक्षात आली असता रीक्षाचालकाने ती बँग वाहतूक शाखा डोंबिवली येथे प्रामाणिकपणे आणुन दिली.ति बँग तपासली असता त्यात रोख ३००००/सापडून आले.काही वेळानी प्रवासी दिनेश जयगडकर रहाणार नालासोपारा ते त्यांच्या नातेवाईकांना एमस हाॅसिपटल मध्ये अँडमिट होते त्यांना बघण्यासाठी आले होते .आणि त्या दरम्यान रीक्षात बँग विसरली ही बाब त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी वाहतूक शाखेत धाव घेतली.

ती बँग त्यांना रिक्षाचालका समोर सहायक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा कल्याण मा. श्री.मंदार धर्माधिकारीआणि डोंबिवली वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांच्या समोर सुपूर्द करण्यात आली.
या प्रामाणिक रीक्षाचालकाचा फूल देऊन सत्कार करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com