फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले घड्याळ विक्रेत्यावर युनिट 5, गुन्हे शाखेची कारवाई

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ; आज रोजी युनिट, 5 गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार गायकवाड, स्वामी, महिला पोलीस अंमलदार स्वाती तुपे, पल्लवी मोरे, असे युनिट 5 कार्यालय येथे मिळाले बातमी च्या आधारे फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे *भरत देवजीबाई प्रजापती राहणार घर क्रमांक 512 उमाप्रसाद सोसायटी शनिवार* *पेठ पुणे* याने त्याचे चामुंडा नॉव्हेल्टीज, शहाबिया सोसायटीचे तळमजल्यावरील पार्किंग मध्ये, शुक्रवार पेठ येथे असलेल्या शॉप मध्ये फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनवलेले बनावटी मनगटी घड्याळे एकूण 175 किंमत अंदाजे 1,75,000 रुपयांचे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी ठेवून त्याची विक्री करीत असताना मिळून आला म्हणून फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 22/2025 कॉपीराईट कायदा 1957 कलम 61,63,65 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशन कडील अधिकारी करीत आहेत. सदरची कामगिरी मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे , मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 2, श्री राजेंद्र मुळीक यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे युनिट 5 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे तसेच युनिट 5 कडील पोलीस अंमलदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट