फरासखाना पोलीसांनी अंमली पदार्थ युक्त (याबा) गोळी विक्री करणारा आरोपी निशान मंडल वर केली कारवाई..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

एकुण ६,५८,८६०/- रु.कि.चा माल केला हस्तगत
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील रेड अलर्ट एरिया मध्ये रात्री उशीरापर्यंत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करण्या-या इसमाचा शोध घेवुन त्यावर सशक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे, यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मधारी यांना महत्वाच्या सुचना व आदेश दिले होते.
दि.१६/०७/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की, बैंगलोर राज्य कर्नाटक येथील एक इसम दिनांक १७/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ युक्त याबा गोळया विक्रीसाठी रेड अलर्ट एरियामधील कॅसेट गल्ली येथे येणार असुन, त्याचेजवळ अंमली पदार्थ युक्त याबा नावाच्या बऱ्याच गोळ्या आहे. सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांचे अधिपत्याखाली छापा कारवाई करण्यासाठी एक टिम तयार करुन, त्यांना कारवाई संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक १७/०७/२०२५ रोजी छापा कारवाई टिमने यशस्वी पणे सापळा लावुन, अंमली पदार्थ युक्त याबा गोळी विक्री साठी घेवुन आलेला इसम नामे निशान हबीब मंडल, वय ४७ वर्षे, रा. मुळ रा. नं. ९/३ वी आर रेसीडेन्सी सेकन्ड क्रॉस गणेश मंदिरराचे मागे, एन जी आर ले आऊट रुपेन्ना अग्रहरा बैंगलोर राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवुन त्यांच्या अंगझडती दरम्यान अंमली पदार्थ युक्त ७५.३६ ग्रॅम वजनाच्या ७१८ नग (याबा) नावाच्या गोळ्या व गुन्हयात वापरलेली दु-चाकी मोपेड गाडी, चार मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ६,५८,८६०/-रु.कि.चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १४४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात त्याला अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, मसपोनि शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, मोरे, गजानन सोनुने, नितीन जाधव, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, संदिप लोंढे मनिषा पुकाळे, रेखा राऊत, अर्चना ढवळे, मालेराव, बनसोडे यांनी केलेली आहे.