फाल्गुनी पाठक दांडियाचे पास देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्चभ्रू इसमाना एम.एच.बी.काॅलनी पोलीसांकडून अटक …

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली:
➡️ एम च बी कॉलनी पोलीस ठाणे गु र क्र ५४५/२०२३ कलम ४२०,४०६,३४ भादवी
➡️ गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-तक्रारदार श्री निहार श्रेयश मोदी वय 20 वर्ष ,धंदा व्यापार, राहणार चॅलेंजर टावर एक, ठाकूर व्हिलेज ,कांदिवली पूर्व, मुंबई यांनी पोलीस ठाणे येथे येऊन कळविले की ,दिनांक 12/10/2023 रोजी 19.40 वाजता दरम्यान हार्दिक मार्बल, न्यू लिंक रोड, बोरवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी एका अनोळखी इसम नामे विशाल शहा व त्याचे सोबत एक अनोळखी साथीदाराने फाल्गुनी पाठक, चिकूवाडी, बोरवली पश्चिम, येथे दांडिया चे कार्यक्रमाचे पासेस देतो असे म्हणून तक्रारदार यांचे कडून रोख रक्कम (पाच लाख 14 हजार 800 ) 5,14,800/- रुपये घेऊन तक्रारदार यांना पासेस न देता त्यांची फसवणूक करून सदर रकमेचा पार केला म्हणून तक्रार दाखल.
➡️ तपास
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व पो नि सुधीर कुडाळकर यांनी तत्काळ पो ऊ नी डॉ दिपक हिंडे यांची व पोलीस पथकाची अनुषंगाने व पोलीस पथकाची नेमणूक केली.
नमूद गुन्ह्याचा पो ऊ नि डॉ दिपक हिंडे व पथक तपास करत असताना आरोपी इसमाचा जो मोबाईल क्रमांक मिळाला असता त्याचे विश्लेषण करून तसेच, डंप डाटा विश्लेषण करून , तसेच योगीनगर ते दहिसर चेक नाका ते गोरेगाव असे सुमारे ८७ सी सी टी व्ही फुटेज तपासून नमूद गुन्ह्यातील एकूण २ आरोपी यांना दिनांक १८/१०/२०२३ रोजी अटक केली असून व बाकी पाहिजे दोन आरोपी यांना दिनांक १९/१० २०२३ रोजी अटक करत आहोत.
गुन्ह्यातील तपासात आरोपी यांनी अतिशय चातुर्याने तीन ते चार रिक्षा बदलल्या होत्या तसेच ज्या फोन वरून फिर्यादी यांना संपर्क साधला होता ते फोन फसवणूक करून बंद केला असल्याने आरोपी याची मिळत नव्हती.
तरीही सदर क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून सर्व आरोपी व मुद्देमाल मिळवण्यास पोलिसांना यश आले.
➡️ अटक आरोपी
१)आश्विन रमाकांत सुर्वे वय २४ वर्ष, व्यवसाय हॉटेल चालक, कांदिवली पूर्व.
२)श्रीपाल मुकेश बागडिया वय ३८ वर्ष, व्यवसाय – इलेक्ट्रिक लाईट बनवणे,
३) सुशील राजाराम तिरलोटकर वय ३० वर्ष, व्यवसाय – वाहन चालक
४) संतोष भागवत गुंबरे वय ३५ वर्ष , व्यवसाय नोकरी .




➡️ हस्तगत मालमत्ता
१)रोख रक्कम ९१ हजार रुपये
२)एक इंनोव्हा गाडी की. अं ९
लाख ५० हजार रुपये
३)आई फोन की. अंदाजे २० हजार रुपये
एकूण हस्तगत मालमत्ता :- १०,६१,००० रुपये
सदरचा तपास परिमंडळ ११ , पो उ आ श्री अजय कुमार बन्सल, स पो आ धरणेंद्र कांबळे, बो वी, तसेच व पो नी सुधीर कुडाळकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केला.





➡️ तपास पथक :-
पो नी सचिन शिंदे, गुन्हे ,
पो ऊ नि डॉ दिपक हिंडे,
पो ऊ नि मंगेश किरापेकर,
पो ऊ नि मुकेश खरात,
पो शी घोडके ,
पो शी शिरसाट यांनी केला अशी माहिती श्री सुधिर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे
मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com